बाजारात नवे काही.. Print

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
* पणशीकर ‘दिवाळी फराळ’ आता सातासमुद्रापार!
alt

पोह्यांचा चिवडा, भाजणीची चकली, तिखट शेव, शंकरपाळी, बेसनाचे लाडू, अनारसे इतकेच नाही नाचणीची चकली, सँडविच शंकरपाळी असे नाविन्यपूर्ण फराळाचे पदार्थ आणि चविष्ठ मिठाई एका फोनवर जगातील हव्या त्या पत्त्यावर आपल्या नातलगांना आता पाठविता येणार आहेत. प्रसिद्ध ‘पणशीकर टेस्टॉरन्ट’ने सणासुदीच्या काळात आपल्या जगभरच्या चाहत्यांना ही सोय करून दिली आहे. सणासुदीसाठी त्यांनी साडेतीन, साडेचार आणि साडेसात किलो अशा तीन वेगवेगळ्या वजनात ही ‘दिवाळी फराळ भेट’ हॅम्पर्स यासाठी उपलब्ध केली आहेत. फराळासोबत, कंदील, पणत्यांचा संच, दिनदर्शिका, रांगोळी स्टिकर आणि पूजेचा संचही सामावून घेता येईल.
* ताराच्या मायरा दागिन्यांवर सूट
तारा ज्वेलर्सने आपल्या मायरा या तयार दागिन्यांवर २० टक्क्यांपर्यंतची सूट देऊ केली आहे. सण-समारंभाचा मोसम लक्षात घेऊन ग्राहकांकडून होणाऱ्या या कालावधीतील खरेदी हेरून ही योजना सादर करण्यात आली आहे. यानुसार ताराची मायरा हे कलेक्शन २९ ऑक्टोबपर्यंत या सवलतीसाठी खरेदी करण्याची सुविधा आहे. महिलांसाठीचे विविध दागिने याद्वारे उपलब्ध करून देण्यात आले असून ते ताराच्या मुंबईतील दालनांमध्ये आहेत.
* बाया डझाईनमध्ये ढोक्रा कृतीचे दिवे
बंगाल, ओरिसा आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये ओळखले जाणाऱ्या ढोक्रा या कलाकृतीच्या नावाने तयार करण्यात आलेले दिवे बाया डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. विशेष आणि बारिक कलाकृतीद्वारे हे दिवे तयार करण्यात आले आहेत. पोलाद धातूंवर ही कलाकुसर करण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्ताने ही विशेष कलाकृती सादर करण्यात आली आहे. बाया डिझाईनच्या लोअर परेल येथील रघुवंशी मिल्स आवारातील दालनात कलाकृतींसह सादर करण्यात आलेले दिवे उपलब्ध आहेत.
*  रिलायन्सच्या सूट-सवलती
आगामी दिवाळीनिमित्ताने रिटेल क्षेत्रातील आघाडीच्या रिलायन्सने आपल्या विविध दालनांमध्ये निरनिराळ्या उत्पादन प्रकारासाठी सूट- सवलत जाहीर केली आहे. यानुसार रिलायन्स फ्रेश/मार्ट/सुपरमध्ये मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ, कपडे यांच्या खरेदीसाठी २० नोव्हेंबपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर रिलायन्स ज्वेल्समध्ये ९ नोव्हेंबपर्यंत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत आहे. चष्मे दालन व्हिजन एक्स्प्रेसमध्ये आकर्षक खरेदीवर भेटवस्तूही देण्यात येत आहेत.
* नोकियाचा ल्युमिया ५१०
ल्युमिया श्रेणीतील ५१० हा मोबाईल फोन नोकिया कंपनीने कमी किंमतीसह सादर केला आहे. यामध्ये आधीच्या ल्युमिया तसेच विन्डोज फोनच्या वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात आली आहेत. या फोनचा डिस्प्ले ४ इंच असून चार आकर्षक रंगांमध्ये ५ मेगा पिक्सलसह तो सादर करण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ल्युमिया ५१० भारतात सर्वत्र उपलब्ध होईल.
* अमरा रेमेडिजचे स्प्रे
अमरा रेमेडिजने भारतातील वैयक्तिक प्रसाधनगृहातील स्प्रे सादर केला आहे. इलेव्हो या नावाने बाजारपेठेत उतरविण्यात आलेला हा स्प्रे प्रसाधनगृहातील किटाणूंपासून होणाऱ्या रोगराईपासून ९९.९ पर्यंतच्या बचाव करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. तीन विविध सुगंधामध्ये हा स्प्रे ७५ मिली आकारात उपलब्ध आहे. अवघ्या पाच सेकंदात याचा परिणाम होत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.
* तनिष्कच्या घडणावळीवर सूट
टाटा समूहातील तनिष्क या तयार दागिने निर्मितीतील आघाडीच्या दालनांमध्ये घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. १५ ऑक्टोबरपासून ही योजना सुरू झाली असून ती दिवाळीपर्यंत कायम आहे. यासाठी २ गॅ्रमपासूनच्या वजनाचे २२ कॅरेटचे सोन्याचे निवडक दागिने खरेदी करण्याची अट आहे. त्याचबरोबर २ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा हिऱ्याचा दागिना खरेदी केल्यास त्यावरही २० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. येथे स्त्रियांसाठी कानातले, पेण्डन्ट, बांगडय़ा आदी दागिने उपलब्ध आहेत.