सीएनजी ‘दोस्त’ही लवकरच Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

कमी वजन वहन क्षमतेच्या वाणिज्य वापराच्या वाहनातील अशोक लेलॅन्डच्या ‘दोस्त’ने भारतीय बाजारपेठेतील आपले वर्षभराचे अस्तित्व नुकतेच पूर्ण केले आहे. वर्षपूर्तीच्या निमित्ताने कंपनीने ‘दोस्त’ची मर्यादित श्रेणीही बाजारात उतरविली आहे. उत्तर भारतात कंपनीचे हे वाहन सीएनजी प्रकारातही सादर करण्यात येणार आहे.
हिंदुजा समूहाच्या या कंपनीने २.५ टन वजन वहन क्षमतेचा ‘दोस्त’ सप्टेंबर २०११ मध्ये रस्त्यांवर उतरविला होता. जपानी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला हा छोटा ट्रक ५५ हॉर्सपॉवरच्या ट्रकसाठी निस्सानचे सहकार्य मिळालेले आहे. सध्या तीन विविध प्रकारातील हे वाहन पॉवर स्टेअरिंग तसेच वातानुकूलित यंत्रणेसहही उपलब्ध आहे. सुरुवातीला दक्षिणेतील चार राज्यांसह महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये दिसणारा ‘दोस्त’ आता गोवा, राजस्थान, छत्तीसगडसह ९ राज्यांमध्येही असेल. या वाहन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा बॅ्रण्ड म्हणून अशोक लेलॅन्डच्या या वाहनाला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला असून सध्या त्याने २० टक्के बाजारहिस्सा राखला आहे. वर्षभरात २५ हजार ‘दोस्त’ या वाहनांची विक्री देशभरात झाली आहे. यासाठी कंपनीचे देशभरात ३५ विक्रेत्यांचे जाळे आहे.