‘स्वप्न संकुल’ गृहप्रदर्शन आजपासून Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
येत्या सणासुदीला मुंबई व आसपासच्या परिसरात स्वत:च्या मनाजोगते घरकुलाचे स्वप्न, ते देखील विशेष सवलत दरासह साकारण्याची संधी मिळाली तर कुणालाही हवीच आहे. घरकुलाच्या स्वप्नपूर्तीची ही संधी २६ आणि २७ ऑक्टोबर २०१२ रोजी गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुल (हॉल २ ए) येथे आयोजित ‘स्वप्न संकुल २०१२’ या गृहप्रदर्शनातून ग्राहकांना मिळणार आहे. शुक्रवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास राज्यमंत्री सचिन अहिर आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहन टांकसाळे यांच्या उपस्थितीत होत आहे.
आघाडीचे विकासक व बिल्डरांचा सहभाग असलेले हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य खुले असून, सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँकेकडून १०.५० टक्के दराने ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाला तत्त्वत: मंजुरी तात्काळ दिली जाईल. टाटा हाऊसिंग, गोदरेज प्रॉपर्टीज, लोढा डेव्हलपर्स आणि बॉम्बे रियाल्टी वगैरे छोटय़ा- बडय़ा विकासकांच्या मुंबई व उपनगरातील गृहप्रकल्पांची ‘स्वप्न संकुल’मुळे एकाच ठिकाणी ग्राहकांना माहिती मिळेल.