‘सेन्सेक्स’ वधारला Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष तुलनेने फायद्याचे जाहीर होत असल्याने भांडवली बाजारात गुरुवारी निर्देशांकात वाढीचे चित्र दिसून आले. वायद्यांच्या ऑक्टोबर मालिकेच्या सौदापूर्तीच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ४८.६१ अंश वाढीसह १८,७५८.६३ वर स्थिरावला. तर ‘निफ्टी’तही १४ अंशांची वाढ झाल्याने तो ५,७०० च्या वर पोहोचला आहे. अनेक कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ नोंदविल्याचा परिणाम संबंधित कंपन्यांच्या समभागमूल्यांबरोबरच एकूण मुंबई शेअर बाजारातवरही दिसून आला. ‘सेन्सेक्स’मधीलच १६ कंपन्यांचे भाव आज वधारले होते. आगामी आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण ‘जैसे थे’ राहण्याच्या शक्यतेनेही गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा मार्ग आज अवलंबिला.
रुपयाही उंचावला
जागतिक अर्थव्यवस्थेच्या पातळीवर अस्थिरता व्यक्त करताना आयातदारांनी डॉलरच्या विक्रीचा क्रम राखल्याने डॉलच्या तुलनेत ५४ पर्यंत जाणारा रुपया गुरुवारी काहीसा उंचावला. भांडवली बाजारातही समभागांची नव्याने विक्री झाल्याने अमेरिकन चलनाचा ओघ वाढून स्थानिक चलन १६ पैशांनी भक्कम होत रुपया आता ५३.५६ पर्यंत झेपावला आहे. दोन दिवस विदेशी चलन व्यवहार बंद राहणाऱ्या यंदाच्या आठवडय़ात पहिल्यांदाच रुपया वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदेशी चलन व्यवहारात रुपया मोठी हालचाल नोंदवित आहे. असे करताना त्याने गेल्या शुक्रवारी तब्बल ४३ पैशांची घसरण नोंदविली होती. रुपया यावेळी डॉलरच्या तुलनेत ५३.८४ पर्यंत खाली गेला होता. आता दोन दिवसांच्या सत्रातील तेजीमुळे तो ५३.५६ पर्यंत गेला आहे.    

निर्मिती क्षेत्रातील संथ वाढ एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम करीत असून दुसऱ्या अर्ध वार्षिकात त्यात उठाव दिसून येईल. परिणामी चालू आर्थिक वर्षांत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ६ टक्के राहण्याची शक्यता आहे.
सी. रंगराजन,
पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार (गुरुवारी दिल्लीत)

सेन्सेक्स
१८७५८.६३
४८.६१

निफ्टी
५७०५.३०
१३.९०

वधारले
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र    ३.५९%
हीरो मोटोकॉर्प    २.३६%
एचडीएफसी    २.०६%
स्टरलाईट इंड.    १.९८%
गेल    १.५५%

घसरले
डॉ. रेड्डीज लेबो.    -२.०३%
स्टेट बँक    -१.४९%
टाटा मोटर्स    -१.२७%
टाटा स्टील    -१.२६%
हिंदुस्थान यूनि.    -१.१६%