किंगफिशरच्या शेअरमध्ये ५ टक्‍क्‍यांनी वाढ Print

alt

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०१२
किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या २६ दिवसांपासून कंपनीत सुरू असलेला संप गुरुवारी मागे घेण्यात आल्यानंतर एअरलाइन्सच्या शेअरच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी सुमारे ५ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
मुंबई शेअर बाजारात आज (शुक्रवार) सकाळच्या सत्रातमध्ये किंगफिशर एअरलाइन्सच्या शेअरमध्ये ४.६ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरचे भाव गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच ११.४० रुपयांवर गेले आहेत. प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच कंपनीला आर्थिकदृष्टय़ा सबळ बनविण्याच्या दृष्टीने आपण पूर्णत सक्षम बनविणारी योजना किंगफिशरने ‘डीजीसीए’ला सादर करून पटवून द्यावी लागेल. या विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाचे त्यातून समाधान झाले, तरच किंगफिशरला पुन्हा वाहतूक सेवा सुरू करण्याचा परवाना मिळू शकेल. त्यामुळे आता एअरलाइन्सचे व्यवस्थापन हवाई वाहतुकीचा परवाना परत मिळावा अशी मागणी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) करण्याची शक्‍यता आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये झालेल्या करारानुसार, कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार येत्या २४ तासांत दिला जाणार असून एप्रिलचे वेतन ३१ ऑक्टोबपर्यंत, मेचे वेतन दिवाळीपूर्वी आणि जूनचे वेतन डिसेंबरअखेरीस अदा केले जाणार आहे, तर जुलै ते सप्टेंबपर्यंतचा थकलेला पगार पुढच्या मार्चपर्यंत दिला जाणार आहे.