‘महिंद्र’च्या वाहनांवर सणासुदीसाठी विविध योजना Print

प्रतिनिधी, पुणे
भारतात मोटार ही मर्यादित समाजाची गरज न राहता सर्वसामान्यांची गरज होऊ पाहात आहे. गरज पूर्ण करणे ही माणसाचा स्वभाव असून यासाठी उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि व्यावसायिक धडपडत आहेत. चारचाकी वाहनांच्या श्रेणीत व्यावसायिक आणि प्रवासासाठी भारतातील सर्वाधिक मोटार खपाच्या महिंद्रातर्फे नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत. सामान्यांची चारचाकी वाहन खरेदीची इच्छा आणि वाढत्या इंधन दरवाढीमुळे त्याला घालावी लागणारी मुरड टाळण्यासाठी महिंद्रातर्फे विविध वाहनांची रेंज बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. ग्राहकांचा कल ओळखून, गरजा पूर्ण करून, जास्तीत जास्त आनंद आणि आराम देणारी वाहने ‘महिंद्रा’ कायमच देत आले आहेत. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ४५ हजारांहून अधिक वाहन विक्रीची नोंद झाली आहे.
व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर बोलेरो मॅक्सट्रक, बोलेरो पिकअप, गेनिओ, अल्फा प्लस, मॅक्सिमो मिनी व्हॅन ही वाहने व्यावसायिकांसाठी मायलेज आणि त्यातून होणारी बचत यासाठी इतरांपेक्षा कायमच सरस आणि तुल्यबळ ठरली आहेत. त्यामुळे व्यावसायिक हे इंधन बचत आणि या वाहनांवर २० ते ३० हजारांपर्यंत मिळणारी सूट यामुळे ‘महिन्द्रा’च्या वाहनांना प्राधान्य देताना दिसतात.
महिंद्राच्या प्रवासी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ, झायलो, क्वॉन्टो, व्हॅरिटो, बोलेरो ही वाहने आरामशीर प्रवास, उत्तम मायलेज यासाठी ग्राहकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत. या प्रवासी वाहनांवर सुमारे २५ ते ५५ हजारांपर्यंत बचतीसाठी महिंद्रातर्फे विविध योजना ग्राहकांना पुरवल्या जात आहेत. महिंद्राच्या वाहनांची स्पर्धा ही वेगाशी नसून ग्राहकांच्या समाधानासाठी असल्याचे महिंद्राच्या वाहन विक्री आणि बाजारातील महिंद्राच्या स्थानावरून स्पष्ट होत आहे.