रुपया ५४ च्या वर; महिन्याचा नीचांक Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
डॉलरच्या तुलने भारतीय चलन ५० पैशांनी घसरल्याने सोमवारी ते सव्वा महिन्याच्या नीचांकाला आले. त्यामुळे रुपया आता प्रति डॉलर ५४ च्या खाली आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे तिमाही पतधोरण उद्या जाहीर होत असताना आयातदार तसेच तेल कंपन्यांच्या वतीने आठवडय़ाच्या  सुरुवातीलाच अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आणि रुपया ५४ च्या गाळात रुतला. रुपया यापूर्वी २० सप्टेंबर रोजी ५४.३८ पर्यंत खाली आला होता. स्थानिक चलन शुक्रवारी ५३.५६ वर बंद झाले होते. तर सोमवारी सत्रात ते सुरुवातीला ५३.८८ खाली आले. दिवसभरात ५३.७६ च्या उच्चांकावर असलेला रुपया दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ५२ पैशांनी खाली आला. महिनाअखेरची आर्थिक तरतूद करावी लागत असल्याने डॉलरची खरेदी वाढल्याचे सांगण्यात येते.