‘टीजेएसबी’चे सतीश उतेकर ‘सर्वोत्तम मुख्याधिकारी’ पुरस्काराने सन्मानित Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
देशभरातील नागरी सहकारी बँकांमध्ये ‘सर्वोत्तम मुख्याधिकारी २०१२’ हा बहुमान टीजेएसबी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर यांनी बहाल केला आहे. ‘बँकिंग फ्रंटियर्स’ या आघाडीच्या नियतकालिकाने अलिकडेच, लवासा, पुणे येथे आयोजित केलेल्या नागरी सहकारी बँकांच्या परिषदेत हा पुरस्कार उतेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सुमारे ८५ पेक्षा अधिक नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या परिषदेत, ‘बेस्ट ब्रॅण्डिंग ऑफ द इयर’ या पुरस्कारासह ‘सहकारातील सवरेत्कृष्ट बँके’चा किताबही टीजेएसबीला बहाल करण्यात आला.