सीमारहित प्रीपेड कार्ड दाखल Print

जगभरात वापरात येणारी अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो, ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर, स्विस फ्रँक, सिंगापूर डॉलर आणि जपानी येन या आठ बलाढय़ चलनांना खिशात मावणाऱ्या प्लास्टिक कार्डमध्ये सामावून सुरक्षित व निर्धोकपणे विदेशगमन शक्य बनविणारेअनोखे ‘सीमारहित प्रीपेड कार्ड’ थॉमस कुक (इंडिया) लि.ने ऐन पर्यटन हंगामाच्या तोंडावर गुरुवारी मुंबईत केले. मास्टरकार्ड वर्ल्डवाइडने या सेवेसाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. ज्यायोगे पैशाचा त्वरित भरणा, आणीबाणीच्या प्रसंगी रोख वितरण, कार्ड हरविल्यास त्याच्या गैरवापराला प्रतिबंध व त्वरित नवीन कार्डाची उपलब्धता आणि जगातील ८० हून अधिक देशात अहोरात्र कार्यरत राहणारी आपत्कालीन जागतिक सहाय्यसेवा पुरविणारे हे एकमेव कार्ड बनले आहे. अ‍ॅक्सेस प्रीपेड वर्ल्डवाइडचे ग्रॅहम पेरी, थॉमस कुकचे व्यवस्थापकीय संचालक माधवन मेनन आणि मास्टरकार्ड वर्ल्डवाइडचे टी. व्ही. शेषाद्री यांनी समारंभपूर्वक कार्डचे अनावरण करताना, सध्या सणासुदीत मर्यादीत काळासाठी हे प्रीपेड कार्ड कोणत्याही नोंदणी शुल्काशिवाय उपलब्ध करीत असल्याची घोषणा केली. थॉमस कुकच्या शाखा, संलग्न ट्रॅव्हल एजंट्स, चलनाचे व्यवहार करणारे मनीचेंजर्स यांच्यामार्फत या कार्डची विक्री सुरू झाली आहे.