घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका!
|
|
पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
देशातील विविध घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेचे गेल्या आर्थिक वर्षांत ६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. ‘अर्न्स्ट अॅण्ड यंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दिल्लीत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालाने ही बाब अधोरेखित केली आहे. ‘अर्न्स्ट अॅण्ड यंग’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील घोटाळे निर्देशांका’च्या पहिल्या आवृत्तीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या अर्धवार्षिकात घोटाळ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. पहिल्या अर्धवार्षिकात हे प्रमाण अवघे ८ टक्के असताना ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ते तब्बल ३६ टक्क्यांनी वधारले आहे.
घोटाळ्यांचे प्रमाण सरकारी विभागासह व्यवसाय तसेच वित्तीय संस्था आणि वैयक्तिक पातळीवरही वाढल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. घोटाळ्यांचा अधिकाधिक परिणाम बँक, वित्तीय संस्था, विमा तसेच म्युच्युअल फंड कंपन्यांवर झाला आहे. ‘अर्न्स्ट अॅण्ड यंग’ने या अहवालासाठी २०११-१२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या १.८० लाख बातम्यांचा आढावा घेतला. या कालावधीत झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी ६३ टक्के प्रमाण हे वित्तीय क्षेत्राशी संबंधित राहिले आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. घोटाळ्यांमुळे यापूर्वीच्या, २०१०-११ या आर्थिक वर्षांत बँकांचे नुकसान ८८ टक्क्यांनी वाढले आहे. या कालावधीत ते ३,७९० कोटी रुपये होते. तर आधीच्या, २००९-१० वर्षांत ते कमी, २,०१० कोटी रुपयांचे होते. १० कोटी रुपयांवरील आर्थिक घोटाळे हे संबंधित कंपन्यांमधील वरिष्ठ पदावरील व्यक्तींच्या सहभागामुळे झाले आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपन्यांच्या निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप आणि आपल्या पदाचा गैरवापर यामुळे हे घडून आले आहे. सर्वाधिक घोटाळे आणि त्यामुळे होणारे नुकसानीचे शहर व राज्य म्हणून अनुक्रमे देशाची राजकीय राजधानी दिल्ली आणि आंध्र प्रदेशचे नाव पुढे आले आहे. २०११-१२ मध्ये दिल्लीत एकूण ८० कोटी रुपयांच्या सर्वाधिक घोटाळ्यांचे प्रकार झाले. तर आंध्र प्रदेशमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सर्वाधिक नुकसान नोंदले गेले आहे. आघाडीच्या १० घोटाळ्यांमुळे झालेले नुकसान हे ५,६७० कोटी रुपयांचे आहे. त्यांचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत हे प्रमाणे ७९ टक्के वाढले आहे.
समूहातील रिटेल क्षेत्रातील ‘स्पेन्सर’ कंपनी लवकरच भांडवली बाजारात नोंदणीकृत केली जाईल. यासाठी मूल्य निश्चिती आदीबाबत सल्लागारांचीही लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. मात्र त्याला किती वेळ लागेल, हे आताच सांगणे कठीण आहे. संजीव गोएंका, आरपी-संजीव गोएंका समूह (गुरुवारी कोलकत्त्यात)
सेन्सेक्स १८५६१.७० ५६.३२
निफ्टी ५६४२.५० २२.८०
वधारले टाटा मोटर्स ४.८९% भारती एअरटेल ४.४१% सिप्ला ३.१२% विप्रो ३.०२% बजाज ऑटो १.७१%
घसरले हिंदुस्थान यूनि. -१.८४% ओएनजीसी -१.३४% आयटीसी -१.२६% गेल -०.९०% एचडीएफसी बँक -०.८९% |