बाजारात नवे काही.. Print

‘सायकल’ लक्ष्मी पूजा संच
सायकल प्युअर अगरबत्तीने यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने नैवेद्य लक्ष्मी पूजा संच सादर केले आहे. पूजाविधीसाठी लागणारे सर्व प्रमुख साहित्य यामध्ये आहे. www.pureprayers.com वर ७०० रुपयांचा हा संच खरेदी करता येईल. पूजेसाठी लागणारे विविध २० साहित्य एक पुस्तिका आणि सीडीसह उपलब्ध आहे.

यंदा वस्त्रखरेदी ‘सीबाझार’वर
सीबाझारडॉटइनने महिला तसेच पुरुषांसाठी नवी वस्त्रप्रावरणे सणांच्या निमित्ताने सादर केली आहेत. इथिनिक प्रकारातील हे कपडे संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये पुरुषांसाठी सिल्क कुर्ता-पायजामा तसेच महिलांसाठी नेट साडी खरेदी करण्याची संधी आहे. Cbazaar.in या व्यासपीठावर विविध प्रकारचे कपडे खरेदी करता येतील.

आयरिसचे रंगीत दिवे
दिवाळीच्या निमित्ताने दिव्यांची आरास करण्यासाठी रिपल फ्रेग्रन्सने घरगुती सुगंधयुक्त दिवे सादर केले आहेत. आयरिस या ब्रॅण्डअंतर्गत असलेल्या या दिव्यांमध्ये चमचमणाऱ्या ग्लो लाईटचा समावेश आहे. त्यांच्या किंमती अनुक्रमे १६० व १२० रुपये आहे. मेगा मार्ट, रिलायन्स टाईम आऊट, रिलायन्स लिव्हिंग, इव्होक, अॅटहोम या दालनांसह yebhi.com व candlekart.com वरही ते उपलब्ध आहेत.

सब कुछ ‘जॉइस्टर टीव्ही’
माहिती, दूरसंवाद व संपर्क आणि मनोरंजन सारे काही घरातील स्मार्ट टीव्हीद्वारे शक्य बनले असल्याचे प्रत्यक्ष रूप ‘जॉइस्टर टीव्ही’ या जॉइस्टर इन्फोमीडिया प्रा. लि. या कंपनीने प्रस्तुत केलेल्या उत्पादनाने दाखवून दिले आहे. हा जॉइस्टर टीव्हीद्वारे इंटरनेटशी सान्निध्य, यूटयूब व्हिडीओज्, चित्रपट, शिक्षणपर आशय आणि ऑनलाइन गेम्स हे सारे शक्य बनले आहे. जॉइस्टर ब्रॉडबॅण्डच्या २५ एमबीपीएस या कल्पनातीत वेगवान अमर्याद इंटरनेट जोडणीने समर्थ हा जॉइस्टर टीव्ही रु. १४,९९९ प्रति वर्ष खर्चाला उपलब्ध झाला आहे. ब्रॉडबॅण्ड जोडणीविना हा टीव्ही बॉ क्स रु. ६,४९९ ला मिळू शकेल.

स्टेशनरीची ‘पिकॉक’ नाममुद्रा
छपाई उद्योगातील अग्रणी द स्टँडर्ड प्रेस (इं) प्रा. लि.ने शाळा व महाविद्यालयीन स्टेशनरी सामग्रीच्या निर्मिती व वितरणात प्रवेश करताना ‘ब्रॅण्ड पिकॉक’ अशी नाममुद्रा या उत्पादनांसाठी घोषित केली आहे. पर्यावरण-स्नेही शालोपयोगी वह्य़ा या श्रेणीत कंपनीने प्रस्तुत केल्या आहेत. महाराष्ट्रापासून सुरुवात करीत या वह्य़ा लवकरच गुजरात व गोव्यातही उपलब्ध होतील.

‘सोशल गिफ्टींग’चे नवे पर्व
देशातील पहिली ऑनलाइन गिफ्ट व्हाउचर कंपनी ‘बधाई डॉट इन (Badhai.in) ने सोशल मीडियाच्या धर्तीवर ‘सोशल गिफ्टींग’च्या नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. सणासुदीला अथवा खासप्रसंगी भेटवस्तू देण्याचा अनुभूतीला आणखी रंजक बनविणारे हे पाऊल असून, ते कोणत्याही सार्वजनिक कार्यात एकाच वेळी अनेकांकडून आर्थिक योगदान ऑनलाइन स्वरूपात गोळा करण्याचाही एक आदर्श मंच ठरेल. यासाठी बधाई डॉट इनने ‘फेसबुक’ या मीडिया साइटशी एकात्म होणारे संधान जुळविले आहे. ग्रुप गिफ्टिंगद्वारे आलेले हे आर्थिक योगदान ‘बधाई व्हाउचर्स’मध्ये रूपांतरित करता येते आणि त्याचा वापर ५०० पेक्षा जास्त विक्री श्रृंखलांमध्ये विनिमयासाठी केला जाऊ शकतो. फेसबुक ग्रुपमधील मित्रांकडून वाढदिवसाला अथवा दिवाळी भेट म्हणून आलेल्या योगदानांच्या एकत्रित बधाई व्हाउचर्सना फोन एसएमएस अथवा प्रिंट कॉपीद्वारे विनिमयासाठी वापरात येऊ शकतील.

रॉयल सेलान्गोर देवतांच्या मूर्ती
दिवाळीत पूजन होणाऱ्या देवतांच्या मूर्तीचा संग्रह रॉयल सेलान्गोरमार्फत सादर करण्यात आला आहे. डिव्हायनिटी या कलेकशन अंतर्गत २४ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेल्या गणेश, कृष्ण आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. लोअर परेल येथील फिनिक्स मिल कम्पाऊंडमधील पॅलेडिअम मॉलच्या रॉयल सेलान्गोर दालनांमध्ये या मूर्ती उपलब्ध आहेत.

ब्रिटानिया शुभकामनायें
दिवाळीचा सण आणि ब्रिटानियाच्या ‘शुभकामनायें’ पॅकचे घट्ट नाते बनले आहे. यंदाच्या दिवाळीतही भेटवस्तू स्वरूपात देता येतील अशा ब्रिटानिया शुभकामनायें श्रेणीमध्ये ‘मीठा-नमकीन’, ‘चॉको डिलाइट’, ‘हेल्थ गिफ्ट’ असे वेगवेगळ्या बिस्किटांच्या ब्रॅण्डचा संग्रह असलेले तसेच दर्जेदार असॉर्टेड कूकीजचा संग्रह असलेले टीन पॅक प्रस्तुतत केले आहेत. हे पॅक रु. ८५ ते रु. ३०० या किमतींमध्ये उपलब्ध झाले आहेत.

‘सोल सिएस्टा’ बेडशीट्स
टीव्ही वाहिनी ‘स्टार’चे होम शॉपिंग दालन ‘स्टार सीजे अलाइव्ह’ने सणांच्या हंगामात रंगांच्या उधळणीचे नावीन्य ‘सोल सिएस्टा’ या विस्मयकारक रंगसंगतीतील बेड लिनेन कलेक्शनद्वारे प्रस्तुत केले आहे. सोल सिएस्टाच्या या फेस्टिव्हल कलेक्शनमध्ये सर्वोत्तम सुती कापडापासून बनलेल्या किंग साइझ बेडला साजेशा चार विविध रंगी (मिक्स एन मॅच स्वरूपातील) बेडशीड्स आणि पिलो केसेस रु. २४९९ किमतीत उपलब्ध झाल्या आहेत.