टीजेएसबीची ७५ वी शाखा सांगलीमध्ये Print

मुंबई : बहुराज्यीय विस्तार सहकार क्षेत्रातील अग्रणी टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या अलिकडच्या आक्रमक शाखा विस्ताराचा अमृतमहोत्सव येत्या शनिवारी १० नोव्हेंबरला सांगलीत ७५ व्या शाखेच्या उद्घाटनाने साधण्याचे ठरविले आहे. सांगली चेंबर ऑफ कॉमर्स व सांगली जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनोहर सारडा आणि सांगलीतील प्रथितयश सर्जन डॉ. शिवानंद सोरतूर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १०.३० वाजता या शाखेचे उद्घाटन होईल. अलीकडेच नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसात दिवसा एक या प्रमाणे १० शाखा सुरू करण्याचा आगळा प्रयोग बँकेने राबविला आहे.