ऊर्जा-प्रगत गुजरात-छत्तीसगडचा ‘इंडिया टेक’ पुरस्काराने गौरव Print

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात नावीन्यता साधून राज्याच्या वेगवान आणि चिरंतन विकासाला चालना देणाऱ्या राज्यांचा मंगळवारी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री अजय माकन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पॉवर २०१२, कन्स्ट्रो २०१२ आणि एबीआरसी २०१२ या गोरेगाव येथील एनएसई संकुलातील तीन दिवसांच्या परिषदेदरम्यान हे पुरस्कार वितरण पार पडले. ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि पुढाकार, नागरी पायाभूत सुविधांचा विकास यातून नागरिकांचे जीवन गुणवत्ता सुधारण्यास उत्तम कामगिरी करणाऱ्या ऊर्जा प्रगत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा माकन यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. गुजरात सोलर पार्क आणि नर्मदा कालव्यावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या उपक्रमासाठी गुजरातला दोन पुरस्कार, तर पश्चिम बंगाल वाहत्या नदीवरील जलविद्युत प्रकल्पासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.