‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी’ Print

पीटीआय , नवी दिल्ली - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्या फेरनिवडीचे भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसायाला स्वागत करण्यावाचून पर्याय राहिलेला नसला, तरी ओबामा यांच्या भारताच्या आऊटसोर्सिग क्षेत्राबाबतची कडवी भूमिका पाहता, ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी असल्याची कडवट प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.  
पूर्वी इन्फोसिसमध्ये संचालक राहिलेल्या व आयगेट या अन्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचे प्रमुख असलेल्या फणीश मूर्ती यांनी ओबामांची पुर्ननिवड ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी वाईट बातमी आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांनी मात्र ओबामांचे धोरण हे आऊटसोर्सिगविरोधी असल्याचा इन्कार केला आहे. उलट ओबामांची पावले आता देशाच्या विकासाच्या दिशेने पडतील तसेच अमेरिकेत अधिक रोजगार निर्मितीत यामुळे वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’चे अध्यक्ष असलेल्या सोम मित्तल यांनीही, भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योग अमेरिकन अर्थव्यवस्थेवर अधिकतर निर्भर असून अर्थव्यवस्था रुळावर आल्यास या क्षेत्रातही रोजगार निर्मिती पूर्वपदावर येईल, असे म्हटले आहे.
टीसीएससह, इन्फोसिस, विप्रो या सारख्या अग्रणी आयटी कंपन्यांचा ८० टक्क्य़ांहून अधिक महसूल अमेरिकेतील व्यवसायाच्या माध्यमातून येतो. लेहमन ब्रदर्सच्या रुपात २००८ च्या अखेरीस अवतरलेल्या अमेरिकेतील आर्थिक मंदीनंतर तत्कालिन अध्यक्ष ओबामा यांनी आऊटसोर्सिंगच्या मुद्यांवरून एकूणच भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेतील रोजगार हिरावून घेणाऱ्या या आऊटसोर्सिग क्षेत्रावर बंदीच्या आश्वासनाचा त्यांनी विद्यमान निवडणूक प्रचारात वापर केला आहे.
ओबामांची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीं झालेली फेरनिवड ही भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी चांगली बातमी नाही. तरीदेखील  अवघड परिस्थितीतही विजय मिळविल्याबद्दल  त्यांना शुभेच्छा.

कर्जदार किंगफिशर एअरलाईन्सने ३० नोव्हेंबरपूर्वी ५,४०० कोटी रुपयांचे भांडवल उभारणे गरजेचे आहे. हा निधी स्वत: मल्ल्या यांच्याक़डून येतो की त्यांच्या यूबी समूहातून हा मुद्दा नसून ते मुदतीत न झाल्यास कंपनीसाठी बिकट स्थिती असेल.
प्रतीप चौधरी, स्टेट बँकेचे अध्यक्ष (बुधवारी गुडगावमध्ये)

सेन्सेक्स
१८९०२.४१
८५.०३

निफ्टी
५७६०.१०
३५.७०

वधारले
एचडीएफसी    १.९२%
स्टेट बँक    १.९१%
भेल    १.७०%
हिंदाल्को    १.०२%
आयसीआय.बँक    ०.९६%

घसरले
टाटा पॉवर    -२.४४%
कोल इंडिया    -०.८८%
भारती एअरटेल    -०.८८%
रिलायन्स    -०.५८%
सिप्ला    -०.१९%