रुपया पुन्हा नरमला Print

मुंबई : भारतीय चलनातील गेल्या दोन दिवसातील भक्कमपणा गुरुवारी काहीसा नरमला. डॉलरच्या तुलनेत १६ पैशांच्या घसरणीमुळे ५४.३६ पर्यंत खाली आलेला रुपया पुन्हा दोन महिन्याच्या नीचांकापर्यंत येऊन ठेपला आहे. आर्थिक सहकार्याच्या अपेक्षेने युरोपात होत असलेल्या युरोपीयन मध्यवर्ती बँकेच्या वातावरणात अमेरिकन डॉलरला मागणी वाढली. परिणामी रुपया दिवसभरात ५५.६७ पर्यंत खाली आला होता.