स्त्री. पु. वगैरे वगैरे : मोबाइल संशयकल्लोळ Print

altमहेंद्र कानिटकर , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पती आणि पत्नी हे संपूर्णपणे फक्त आपलेच असले पाहिजेत आणि त्यांचा वेळसुद्धा कोणी शेअर करता  कामा नये या मानसिकतेतून बाहेर पडायला काही वर्षे जावी लागतील. आकर्षण िबदू जर पती-पत्नीने एकमेकांशी मोकळ्या मनाने सांगितले तर कदाचित एकमेकांचे मित्र-मत्रिणी स्वीकारणे शक्य होईल. हे करत असताना VIRTUAL RELATIONSHIP ADDICTION ही जी समस्या आहे त्याचाही विचार करावा लागेल. नाही तर तसबिरीच्या घोटाळ्याऐवजी मोबाइल घोटाळा होऊन घरोघरी ‘संशयकल्लोळ’चे प्रयोग सुरू व्हायला वेळ लागणार नाही! पुरुषांना मत्रिणी असाव्यात, असे का वाटते, असा प्रश्न माझ्या एका नातेवाईक स्त्रीने विचारला आणि पुढे ही ती बरेच काही बोलली. तिच्या मते, एकदा लग्न झालं की पुरुषांना मत्रीण असण्याची अजिबात जरुरी नसते. त्याला जे मत्रिणीशी बोलावेसे वाटते ते त्याने पत्नीशी बोलावे. ‘सात फेरे’ घेताना पती म्हणतो, ‘आता तू माझी सखी हो.’ ती बांधीलकी येते. हे स्त्री आणि पुरुष दोघांना लागू आहे. पत्नी जर त्याची हक्काची सखी असेल तर त्याला वेगळ्या मत्रिणींची गरजच काय, असा तिचा साधा सवाल होता. ती असेही म्हणाली की, स्त्री - पुरुष नाते संपूर्णपणे शारीरिक आकर्षणविरहित असूच शकत नाही. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर हे आकर्षण प्रबळ होऊ शकते.
मी म्हणालो, ‘‘बाई, कोणत्या जमान्यात वावरते आहेस?’’
तिला, मी बाई म्हणणे तिला लागले असावे. ती म्हणाली, ‘‘तुला माहीत आहे की मी जेमतेम तीस वर्षांची आहे आणि आयटीत काम करते. पण मी जेव्हा माझ्या भोवतालचे वातावरण बघते, तिथे अनेक विवाहित पुरुष, अविवाहित असूदे की विवाहित अशा तथाकथित मत्रिणीशी ज्या पद्धतीने वागत असतात ते मला काही सहन होत नाही. किती हसणे खिदळणे, आपापल्या बायकांच्या किंवा नवऱ्याच्या थट्टा हे इतक्या सहज होत असतात की विचारू नको. मी असे अनेक नवरे पहिले आहेत जे एकेकटे आपल्या मत्रिणींना डिनरला नेतात. एकमेकांना काही ना काही कारण काढून ट्रीट देतात किंवा घेतात. माझा साधा प्रश्न आहे या सगळ्यात बायकोला सहभागी करून घ्यायला काय हरकत आहे? ती बिचारी घरी आणि तो डिनर चापतोय! यालाही अर्थच नाही.’’
मी खडूसपणे म्हणालो, ‘‘ नवरा बिचारा नाही का?’’
‘‘टाळी दोन्ही बाजूंनी वाजत आहे हे मला मान्य आहे. पण तुलनेने विवाहित महिला अविवाहित पुरुषांशी कमी प्रमाणात मत्री करीत असाव्यात असा आपला माझा अंदाज आहे. पण पुरुषांचं तसं नसतं. त्यांना कोणीही मत्रीण असली तरी चालते. तू लिहीच या विषयावर ‘चतुरंग’मध्ये. बघशीलच तू सगळ्या बायका माझ्याशी सहमत होतील की नाही!’’ ती अगदी ठामपणे म्हणाली.
अविवाहित किंवा विवाहित स्त्री - पुरुष मत्रीचा आपल्याकडे मोठा इतिहास नाही.(द्रौपदीचा कृष्ण सखा होता.. पण तोही लांबचा भाव.)अगदी मी कॉलेजमध्ये असतानासुद्धा कॉलेजच्या कट्टय़ावर आम्ही काही निवडक मित्र मत्रिणी एकत्रित गप्पा टाकत असू. पण त्यातील दोघांनी ग्रुपमधल्या मुलींशी लग्न केली. तिसऱ्याचे एकतर्फी होतेच. एकीने माझ्याच सीनिअर मित्राशी लग्न केलं. आमच्या कॉलेजमधील ग्रुपमध्येही फार वेगळी परिस्थिती नव्हती. काही वर्षांपूर्वी मानलेला भाऊ -बहीण इत्यादी इत्यादी प्रकार असायचे. पण ८०च्या दशकात माझ्या आसपास निखळ मत्री वगरे प्रकार त्या मानाने तुरळक होते. एकाने कुणी तरी नाही म्हणले तरी संवाद चालू ठेवणे, एकमेकांच्या लग्नाना जाणे इतपतच मत्री हा प्रकार होता. आमची पिढी नोकरीत आली तेव्हा आसपास मुली दिसू लागल्या होत्या. जरा कुठे मत्रीचा धागा जुळेल असे वाटत असताना त्यांची लग्नं होत.
कामाच्या ठिकाणी जे नसíगक गट झाले त्यात स्त्री-पुरुष दोघांचा समावेश होता. डबा खाताना वगरे गप्पा होत पण काम संपल्यावर सगळे आपापल्या संसारात रमत असत. एखाद् दुसरा एका विशिष्ट स्त्रीशी जास्त गप्प मारू लागला तर चर्चा होई. माझ्या पाहण्यात अशी एक जोडी होती. त्यांची मत्री कार्यालयातून घरापर्यंत पोहोचली होती. तिचा नवरा घरात नसेल तेव्हा हा हमखास तिच्या घरी जाऊन टपके आणि आपल्या बायकोबद्दल तक्रारी करे. तो गप्पिष्ट आणि तिचा नवरा अबोल त्यामुळे त्याच्याशी बोलणं तिला सुखावह वाटत असे. हळूहळू तो रोजच गप्पा मारायला तिच्या घरी जाऊ लागला. आणि तेही नेमकं सकाळी. मुले  शाळेत आणि नवरा कामात असताना. तेव्हा मात्र तिच्या मनाला पटेना. तिने त्याला पुष्कळ समजावून सांगायचा प्रयत्न केला की, ‘हे वाईट दिसतं. तू मुलं असताना ये आणि रोज येण्याची गरज नाही.’ पण त्याच्यात काही फरक पडेना. ती जाम वैतागली. एकदा आम्हा दोघांना तिने तिची गोष्ट सांगितली. मग एकदा मी त्याला घेऊन बसलो. तुम्ही चांगल्या घरातले आहात.. वगरे टेप लावली. तो फक्त आमची मत्री आहे, हेच सांगत होता. अखेर तो म्हणाला, बहुधा मी तिच्या प्रेमात पडलोय. आणि मला तिच्याशी बोलल्याशिवाय चन पडत नाही. मला ते अपेक्षित होतं. मग पुन्हा माझी टेप .. (तेव्हा मी समुपदेशक वगरे नव्हतो.) पुढे एकदा तिच्या नवऱ्याला हा गृहस्थ रोज तिला एकटीला भेटायला येतो वगरे कुठून तरी समजलं.. त्याने रागाच्या भारत तिलाच थोबडून काढलं. दरम्यान त्याची बदली झाली आणि मत्री प्रकरण तिथेच संपलं.
तरीही काही मित्र मत्रिणीच्या चांगल्या जोडय़ा पाहण्यात आल्या. पण ती बहुधा कौटुंबिक मत्री असे. आमच्याही घरी तसंच वातावरण होतं. माझे मित्र तिचे मित्र होते आणि तिच्या मत्रिणी माझ्या. पण आमची मोकळेपणाची बोलणी एकमेकांसमोर होत. तिच्या मत्रिणीचा फोन आला तर जुजबी बोलून मी फोन तिला देत असे. एकदाच माझा एक मित्र मी नसताना वारंवार घरी येऊ लागला. तेव्हा तिने त्याला असे झापले की त्याने माझ्याशीही संपर्क करणे बंद केले. सारांश, अनेकांची स्त्री-पुरुष मत्री ही एकमेकांच्या पती-पत्नीसह होती. त्यातही थोडं आकर्षण  असायचंच. पण ते बहुधा अव्यक्त असे.
या संस्कृतीत वाढलेल्या मलासुद्धा चाळिशीत आल्यावर इतर अनेकांप्रमाणे स्त्री-पुरुष मत्रीबद्दल कुतूहल वाटू लागले. तेव्हा नुकतेच मोबाइल आले होते आणि तरुणीशी मोबाइलवर बोलणे आवडू लागले. कामाव्यतिरिक्तही गप्पा होत. एक दिवस माझ्या मोबाइलवरून केलेले फोन एकीलाच जास्त होत आहेत हे गौरीच्या लक्षात आले. आणि संशयाचे धुके निर्माण झाले. ते कमी होता होता बरेच दिवस गेले आणि लक्षात आले वाटणे वेगळे आणि निस्तरणे वेगळे.
पण गेल्या सप्ताहात एका विवाहित स्त्रीने सांगितलेला अनुभव मला विचारात पडणारा होता. तिचे आणि नवऱ्याचे अजिबात पटायचे नाही. एक सहकारी तिचे प्रश्न ऐकून घ्यायचा म्हणून तो जवळचा वाटू लागला. अचानक त्याची बदली झाली. मग ती त्याला रोज तीन-चार मेल पाठवायची. पण कामात असताना मेल करणे जमायचे नाही म्हणून एसएमएस सुरू झाले. ती इतकी नादावली की दिवसातून ५०-५० एसएमएस जायचे यायचे. त्यातली भाषा बदलली. इतरांनी वाचू नये अशी झाली. बाकी दोघे कधी भेटत नसत की फोन करीत नसत. अखेर व्हायचे तेच झाले. फोन नवऱ्याच्या हातात पडला आणि तिची रवानगी माहेरी. अगदी या काळातसुद्धा अशी स्त्री-पुरुषांची मत्रीही नवऱ्यांना  आणि बायकोंना झेपत नाही..
पण साध्या मत्रीतसुद्धा सुप्त आकर्षण दडलेले असते असे मला वाटते. भिन्न िलगी व्यक्ती आकर्षक नसेल तर दीर्घ सहवासानंतरसुद्धा ती मत्रीण नाही  किंवा मित्र नाही तर केवळ सहकारी आहे असा रोख असतो.
आमची relationship is only functional म्हणणारे अनेकजण असतात. पण मी जे आकर्षण म्हणतो ते शारीरिकच असायला पाहिजे असे अजिबात नाही. नाही तर बुद्धिमत्ता, धडाडी, संवादातला मोकळेपणा, कलागुण असे अनेक आकर्षणाचे िबदू असू शकतात जे आपल्या पतीकडून किंवा पत्नीकडून सहजासहजी मिळत नाहीत. असे आकर्षण िबदू कार्यरत होतात आणि मत्री घडून येते.
अर्थात मत्री करायला आणि ती निभावून न्यायला खूप धाडस असावे लागते. कारण अशी मत्री सध्याच्या काळातही लपवून ठेवण्याकडे  कल असतो. एकमेकांसाठी स्वतंत्र मेल आयडी वापरणे, एसएमएस व फोन भलत्याच नावाने सेव्ह करणे या गोष्टी तर सर्रास घडताना दिसून येतात.
मुळात प्रश्न हा आहे की, पती आणि पत्नी हे संपूर्णपणे फक्त आपलेच असले पाहिजेत आणि त्यांचा वेळसुद्धा कोणी शेअर करता काम नये या मानसिकतेतून आपण बाहेर पडायला अजून काही वर्षे जावी लागतील.
आकर्षण िबदू जर पती-पत्नीनी एकमेकांशी मोकळ्या मनाने सांगितले तर कदाचित एकमेकांचे मित्र-मत्रिणी स्वीकारणे शक्य होईल.( तरीही एखदी पत्नी जर म्हणेल की अमुकतमुक मला physically attractive वाटतो तर किती पुरुष ते निखळपणे घेतील याबद्दल साशंकता आहेच. असो)
हे करत असताना VIRTUAL RELATIONSHIP ADDICTION ही जी मोठी समस्या होऊ घातली आहे त्याचाही विचार करावा लागेल. मोबाइल किवा इंटरनेटव्यतिरिक्त प्रत्यक्षात एकमेकांशी कमी होत जाणारे संवाद, छोटी कुटुंबं आणि आहेत ती नाती समृद्ध करण्याबाबत असलेली उदासीनता या गोष्टींचाही विचार करायलाच हवा. नाही तर तसबिरीच्या घोटाळ्याएवजी मोबाइल घोटाळा होऊन घरोघरी ‘संशयकल्लोळ’चे प्रयोग सुरू व्हायला वेळ लागणार नाही!
या विषयावर अजून काही पुढल्या भागात!