स्त्री. पु. वगैरे वगैरे : विवाहित स्त्री-पुरुष मत्री एक समंजस प्रवास Print

altमहेंद्र कानिटकर , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मत्रीमध्ये एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्ट हवे. मत्री म्हणजे प्रेम नाही हे दोघांनाही मान्य हवे. मत्री ही ज्या गोष्टी कुटुंबातल्या आणि प्रेमाच्या माणसांशी शेअर करू शकत नाही अशा गोष्टी शेअर करण्याची हक्काची जागा असते. म्हणजेच अशा ठिकाणी गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यात एकमेकांची सहानुभूती मिळवायची नसून केवळ भावनांना वाट करून देण्याचे ठिकाण असते हे भान आवश्यक आहे. हे भान म्हणजे आव्हान आहे आणि अडथळासुद्धा! मध्यंतरी अमेरिकेत एक पाहणी केली गेली; प्रेमविवाह केलेल्या तरुण-तरुणींची. त्यात त्यांना विचारले होते, ‘तुमचा परिचय कसा झाला आणि त्याचं लग्नात रूपांतर कसे झाले?’ ९२ टक्के तरुणांनी सांगितले, आधी ओळख झाली, मग मत्री आणि त्या मत्रिणीला मागणी घातली आणि लग्न झाले. तर फक्त ६७ टक्के तरुणींनी आपल्या मित्रांशी लग्न करणे पसंत केलं. आढळलेला गमतीदार अनुभव असा की, पुरुष जेव्हा मत्री करतात तेव्हा कुठेतरी हे नाते पुढे जावे असेच वाटत असते. तरुणींचा तसा इरादा असेलच असं नाही. याच पाहणीतील काही निष्कर्ष, जरी आपल्या संस्कृतीत बसणारे नसले तरी धक्कादायक आहेत. ८५ टक्के तरुणांनी पहिला सेक्सचा अनुभव मत्रिणीबरोबर घेतला, तर ९३ टक्क्यांपेक्षा जास्त तरुणींचा पहिल्या सेक्सचा अनुभव त्यांच्या मित्रांबरोबरच होता. सांगायचं इतकंच की, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातसुद्धा स्त्री-पुरुष मत्री ही एक तर लग्नसंबंधात बदलली किंवा सेक्सचा अनुभव घेती झाली. म्हणूनच स्त्री-पुरुष मत्री सेक्स या विषयाला टाळून करणे ही मोठी अडथळ्यांची शर्यत असते आणि त्यात इतर आव्हानेपण बरीच असतात.
मत्री म्हणजे नेमके काय?
मत्रीमध्ये एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्ट हवे. मत्री म्हणजे प्रेम नाही हे दोघांनाही मान्य हवे. मत्री आणि प्रेमाच्या सीमारेषा अनेकांना माहिती नसतात. मत्री ही प्रामुख्याने ज्या गोष्टी आपण कुटुंबातल्या आणि प्रेमाच्या माणसांशी शेअर करू शकत नाही अशा गोष्टी शेअर करण्याची हक्काची जागा असते. म्हणजेच अशा ठिकाणी गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. विवाहित पुरुषांच्या मत्रीत पत्नीच्या तक्रारी येतील, पण ती मत्रिणीची सहानुभूती मिळवण्यासाठी नसून केवळ आपल्या भावनांना वाट करून देण्याचे ठिकाण असते. पण हे भान म्हणजे आव्हान आहे आणि अडथळासुद्धा.
माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. तो अत्यंत हुशार आणि सौंदर्यवादी. आयुष्य मस्त मजेत उपभोगावे, भरपूर भटकावे, भरपूर खरेदी करावी, सिनेमे पाहावेत, अशी त्याची वृत्ती. पण त्याचे लग्न त्याच्यामानाने कमी रसिक आणि व्यवहारी मुलीशी झाले. तिचा सगळा फोकस मुले आणि संसार यात. त्याच्याच ऑफिसमध्ये एक सहकारी उच्चशिक्षित घटस्फोटिता होती. दोघांच्या मजबूत गप्पा होत. हळूहळू मत्री झाली. ती अधिक गाढ झाली. तो अगदी सहजपणे त्याच्या बायकोच्या अरसिकतेबद्दल आणि एकूणच तिच्या अतिव्यवहारी वृत्तीबद्दल सांगत असे कारण त्याच्या मते ती त्याची चांगली मत्रीण होती. पण काहीच दिवसांत ती त्याच्या चक्क घट्ट प्रेमात पडली. त्याने ‘वी आर जस्ट फ्रेंड्स’ हा केलेला जप तिला मान्य नव्हता. तिने त्याला अक्षरश: वेठीला धरले आहे. हा गुंता कसा सोडवायचा या प्रश्नात अजूनही तो अडकलेला आहे..
म्हणजेच, मत्री म्हणजे प्रेम नव्हे; आणि आपण कायम मित्रच राहणार आहोत हे दोघांनीही स्पष्ट करायला हवं.
आकर्षणाबद्दल बोलणे :
जर खरोखरीच विवाहित स्त्री-पुरुषांना एकमेकांशी मत्री करायची असेल तर आपल्या एकमेकांमधील शारीरिक आकर्षणाच्या गोष्टींना कायमची रजा द्यायचा अलिखित करार असलाच पाहिजे. त्याकरता एकमेकांचे आकर्षण िबदू एकमेकांना माहिती हवेत आणि ते िबदू मधे येणार नाहीत याची काळजी दोघांनीही घेतलीच पाहिजे, नाहीतर मत्रीतला तो मोठा अडथळा ठरू शकतो.
आमच्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका मध्यमवयीन स्त्रीचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. ती गृहिणी. नवरा दुबईला. पशाची कमी नाही. एकच मुलगा, तो बारावीत. तिला फेसबुकवर तासन्तास बसायचा नाद लागला. एक तरुण इंजिनीअर तिचा ‘फ्रेंड’ झाला. खूप चॅटिंग वगरे झाले. अखेर एकदा प्रत्यक्ष भेटले. भेटत राहिले. पण तिने एकदा त्याला स्पष्ट सांगितले, ‘तू दिसायला स्मार्ट आहेस, आकर्षक आहेस. तुझ्या कमावलेल्या तब्येतीवर मी खूश आहे. ते मला आकर्षति करते. पण मी मोहात पडू नये म्हणून तू मला मदत कर.’ त्यानेही सांगितले, ‘तुझ्याकडे पाहून मला मोह झाला होता. पण तुझ्या संसारात अडचण येऊ नये म्हणून साधा स्पर्शही न करण्याची मी दक्षता घेईन.’
या दोघांमधली स्पष्टता मला आवडली होती. पण तिच्या नवऱ्याला ती समजलीच नव्हती, म्हणून ती माझ्याकडे आली होती. अडथळे आणि आव्हाने असतात ती अशी!
मत्रीतली समानता :
सामान्यत: असे गृहीत असते की, दोन मित्र एकाच पातळीवर असतात. श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही मत्रीत नसते. विवाहित स्त्री-पुरुष मत्रीमध्ये हा घोळ होण्याचा धोका असतो. प्रश्न केवळ समानतेपुरता मर्यादित नसतो, तर त्यात एक छुपा पॉवर प्ले असतो. आपापल्या वैवाहिक जीवनात जी सत्ता गाजवण्याची ऊर्मी साध्य झाली नाही ती मत्रीत शोधण्याचा प्रयत्न कोणीतरी एक जण करीत राहिला तर ती मत्री न राहता केवळ एक वैध नात्यात जे जमले नाही ते करण्याची संधी ठरते. अशा मत्रीत कोणीतरी एकजण बॉसिंग करीत राहतो. काही अनुभवात असं लक्षात आलं की, नेमस्त पती असलेल्या बायका बॉसिंग करणाऱ्या मित्राच्या शोधात असतात. माझ्याकडे आलेली एक विवाहिता सांगत होती, ‘माझा नवरा नुसता होयबा आहे. त्याला त्याचे म्हणून काही मतच नसते. मी म्हणेन त्याला तो मम म्हणतो. पण माझ्या मित्राचं तसं नाही. तो माझ्याशी वाद घालतो, मुद्दे खोडून काढतो. कधीतरी ‘तू गाढव आहेस’, ‘एव्हढे कसे कळत नाही’ अशी आक्रमक भाषासुद्धा वापरतो. त्यामुळे मी त्याच्याशी जास्त कम्फर्टेबल असते आणि माझा नवरा असा की मी त्याच्याशी सारखीच बोलते याचाही त्याला राग येत नाही.’
अशा प्रकारच्या मत्रीत सीमारेखा न ओलांडणे हे मोठे आव्हान असते.
आसपासच्या नजरा आणि समज
विवाहित स्त्री-पुरुषांची अन्य स्त्री-पुरुषांशी असलेली नाती वेगवेगळ्या लेबल्सने ओळखली जातात. लफडे, भानगड, प्रकरण, त्यांच्यात काहीतरी आहे, स्पेशल फ्रेंड? अशी काही नावे. समाज आपल्या नात्याला काहीतरी नाव देणारच हे मत्रीतल्या स्त्री-पुरुषांना लक्षात घ्यावेच लागते. त्याला अपवाद असणार नाही. आपण आपल्या नात्याला काय म्हणतो त्यापेक्षा इतर काय म्हणतात हे अशा नात्यात अनेकदा निर्णायक ठरू शकते. लफडे हा शब्द explicitly sexual Relationship सांगतो. भानगड या शब्दात फक्त शारीरिक नात्याची शक्यता मांडलेली असते. प्रकरण शब्दात भावनिक गुंतवणूक आहे असे इतरांना वाटते; तर बाकी सगळे उल्लेख समाजमान्य नसलेली कृती दर्शवितात. आपले नाते या सगळ्या शब्दांपासून जितके लांब ठेवण्यात जे यशस्वी होतात ते त्यांच्या त्यांच्या जोडीदाराबरोबरचे संबंध बिघडू देत नाहीत.
मित्र किंवा मत्रीण मिळेल तरी कुठे?
माझ्याकडे आलेली एक विवाहित स्त्री सांगत होती, ‘माझं माझ्या मत्रिणीशी फारसे जमत नाही. बहुतेक सगळ्या संसाराबद्दल बोलतात किंवा फुटकळ गप्पा, गॉसिप करतात. क्लब हे माझ्यासाठी नाहीतच. मला बौद्धिक गप्पा हव्याशा वाटतात. माझा नवरा उच्चशिक्षित आहे, पण तो फार कामापुरते बोलतो. बराच वेळ तो ऑफिसच्या कामामुळे बाहेर असतो किंवा उशिरा येतो. मला नेहमी वाटत आले की अगदी कॉलेजमध्ये असतानासुद्धा मला मित्रच जास्त असायचे. पण ते सगळे लग्न होऊन लांब गेलेत. भेटले तरी जुजबी गप्पा होतात. माझ्या मनाची ही अवस्था चूक का बरोबर मला माहीत नाही, पण एक छानसा मित्र असणं माझी गरज आहे. मी फार भावनाप्रधान वगरे नाही आणि मला शेअर करण्यासारख्या समस्या नाहीत. पण आता मित्र मिळणार तरी कुठे, असा प्रश्न अनेक पुरुषांचाही आहे. एक विशिष्ट वय झाल्यावर मत्रीण मिळणार तरी कुठे? कुठे शोधायची? हे खरेच मोठे आव्हान आहे.
या आव्हानाला तोंड देऊन मत्री करणाऱ्या स्त्री-पुरुषांना काही सत्ये स्वीकारावीच लागणार आहेत.
* कितीही म्हटले तरी मत्री वाढत्या वयानुसार कमी कमी होत जाते. तरुणपणातील घट्ट मत्री लग्न झाल्यावर कमी होऊ लागते आणि दोघांची लग्ने झाल्यावर तर ती जेमतेम राहते. प्रौढ स्त्री-पुरुष मत्रीचे प्रमाण अमेरिकेतसुद्धा जेमतेम दोन टक्के आहे. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या संघातून गप्पा दिसून येतात, पण मत्री अभावानेच. काही वर्षांपूर्वी पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या एकटय़ा स्त्री-पुरुषांचा एक मेळावा आम्ही घेतला होता. तिथेही लग्न करू म्हणणारेच जास्त. मत्रीचा विचारही कोणाला फारसा झेपणारा नव्हता.
* या मत्रीचा पुरुषांना नक्कीच फायदा होतो. पुरुषांची मत्रीची कल्पना कृतीभोवती आधारलेली असते. खेळात सहभागी असणारे मित्र, नाक्यावरचे मित्र अशी. त्यांच्यात भावनिक देवाणघेवाणीला फार मोठे महत्त्व नसते. पण जर त्याला मत्रीण असेल तर ती त्याची भावनिक शेअरिंगची गरज भागवण्याची शक्यता असते.
* स्त्रियांचाही फायदा असतोच. त्यांना एकतर पुरुषांचा दृष्टिकोन काय आहे हे कळू शकते. सर्वसाधारणपणे पुरुष कसा विचार करतात, त्यांची प्रतिसाद द्यायची पद्धत काय हे समजू शकते. भाऊ नसलेल्या अनेक मुली सांगतात की, समवयस्क मुले नेमके कशी वागतात याची आम्हाला कल्पनाच नसते.
* मत्रीचा सेक्सशी संबंध नसतो. जर ती गोष्ट मध्ये येत असेल तर मत्री थांबवणे इष्ट. त्याला रोमँटिक अँगलही नको
खरेतर हा लेख मी इथेच पूर्ण करणार होतो. पण झाले काय, मी एका मित्राला ड्राफ्ट वाचायला दिला.. तो म्हणाला, एव्हढय़ा सगळ्या भानगडी लक्षात घेण्यापेक्षा बायकोलाच मत्रीण करणे सोपे!