संक्षिप्त Print

बँकिंग, विमा पदविका अभ्यासक्रम
मुलुंड येथील केळकर-वझे महाविद्यालयात डिप्लोमा इन इन्शुअरन्स अँड बँकिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. १२ वी उत्तीर्ण असलेल्यांना आपले पदवी शिक्षण घेत असताना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. एक वर्षांच्या या अभ्यासक्रमास पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता आहे. इन्शुअरन्स, बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम एका वर्षांत पूर्ण करता येईल. दर रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग महाविद्यालयात होणार असून येत्या रविवार, ७ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयात श्रावणकुमार रजक यांच्याशी ९०२९२९०४८४ या मोबाइलवर संपर्क साधावा.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
राजगुरू टुर्सतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यटनातील आनंद’ किंवा ‘गिर्यारोहण- एक आव्हान’ असे दोन विषय महाविद्यालयीन गटासाठी आहेत, तर खुल्या गटासाठी ‘मी अनुभवलेली सहल’ किंवा ‘पर्यटन एक थीम-२०१२’ असे विषय आहेत. स्पर्धेचा निकाल येत्या ३० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२४३१८०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुलेखन प्रदर्शन
सुभाष गोंधळे यांच्या सुलेखनाचे प्रदर्शन काळा घोडा येथील अ‍ॅडोर हाऊस, आर्टिस्ट सेंटर गॅलरी येथे भरविण्यात आले असून ते येत्या ७ ऑक्टोबपर्यंत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत खुले आहे.
पुस्तक प्रदर्शन
मुंबई सवरेदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नाना चौक येथील गांधी बुक सेंटर येथे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे व सवरेदयावरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू असून पुस्तक खरेदीवर १० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.