हेमंत पंडित, विशाल म्हात्रे यांना यंदाचे सहवादक पुरस्कार जाहीर Print

प्रतिनिधी
‘स्वरबंध’ या संस्थेतर्फे दरवर्षी संगीतात साथ करणाऱ्या कलावंतांना पुरस्कार दिले जातात. संगीत क्षेत्रातील सहवादक कलावंत नेहमीच उपेक्षित राहतात. पडद्यामागच्या या कलावंतांचा गौरव करण्यासाठी दिले जाणारे सहवादक पुरस्कार यंदा व्हायोलिन वादक हेमंत पंडित आणि ढोलक वादक विशाल म्हात्रे यांना जाहीर झाले आहेत. रविवारी (७ ऑक्टोबर) यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे रात्री आठ वाजता सहवादक पुरस्कार सोहळा होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांच्या हस्ते हेमंत पंडित आणि विशाल म्हात्रे यांना गौरविण्यात येणार असून दहा हजार रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू झालेल्या ‘स्वरबंध’ संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी युनिटी इन्फ्रा प्रोजक्ट्सचे किशोर अवर्सेकर यांनी सहकार्य केले आहे.