मच्छिंद्र कांबळी यांच्या छायाचित्राचे अनावरण Print

नाटय़ प्रतिनिधी
रंगभूमीवरील अनभिषिक्त मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या पाचव्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे मच्छिंद्र कांबळी यांचे छायाचित्र यशवंत नाटय़संकुलात लावण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यशवंत नाटय़संकुल उभारण्यात मच्छिंद्र कांबळी यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. ‘वस्त्रहरण’ नाटकाद्वारे त्यांनी मालवणी भाषेला नाटय़रसिकांमध्ये मानाचं स्थान मिळवून दिले. तिला साता समुद्रापार नेले. यशवंत नाटय़संकुलात लावण्यात आलेल्या मच्छिंद्र कांबळी यांच्या या तसबिरीचे अनावरण ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी झाले.