डॉ. आबान मिस्त्री श्रद्धांजली कार्यक्रम Print

प्रतिनिधी
भारतातील पहिल्या महिला तबलावादक आणि संगीताच्या अभ्यासक डॉ. आबान मिस्त्री यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वरसाधना समिती या संस्थेतर्फे शनिवार, ६ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयाजेन करण्यात आले आहे. पं. ओमकार गुळवाडी यांचे तबलावादन आणि केदार बोडस यांचे गायन असा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रम ताडदेव येथील तालामकी वाडी सभागृहात होणार आहे.