संक्षिप्त Print

‘मानव संसाधन विकास’ वर चर्चास़त्र
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर’च्या वतीने २० ऑक्टोबर रोजी ‘मानव संसाधन विकास’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर्सच्या कार्यालयात कासलीवाल सभागृह, ओरिकॉन हाऊस, ६ वा मजला, फोर्ट, मुंबई ०१ येथे होणार आहे. या चर्चासत्रात डॉ. विल्फ्रेड माँटेरो मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्राच्या नावनोंदणीसाठी ९८१२०२९४७३, २२८५५८५९-६० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन ‘एमसीसीआयए’ने केले आहे.
‘मधुशाला’ मराठीत
सुप्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांची लोकप्रिय रचना असलेला ‘मधुशाला’ हा काव्यसंग्रह आता ‘मदिरालय’ नावाने मराठी भाषेत उपलब्ध झाला आहे. अस्मिता ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या काव्यसंग्रहाचा अनुवाद वसंत बागुल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६९४३५३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जागतिक टपाल दिनानिमित्त ‘पत्रोत्सव’
जागतिक टपाल दिनानिमित्त मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी ‘पत्रोत्सव’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साठये महाविद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार असून पोस्टमास्टर जनरल ए. के. शर्मा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अनिल हर्डीकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात धवल चांदवडकर, सावनी रवींद्र, सत्यजित प्रभू, नीलेश परब, आर्चिस लेले, दत्ता तावडे, अमर ओक आदी कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी ९८१९४२१८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संकेतस्थळाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य आणि संस्कृतीची पर्यटकांना ओळख व्हावी, यासाठी ‘सिंधुदुर्ग गाइड डॉट कॉम’ (sindhudurgguide.com) हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासंबंधीचे अनुभव, छायाचित्रे, माहिती यांची देवाणघेवाण व्हावी, या हेतूने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या मंडळींना नावनोंदणी करून लेख, छायाचित्रे अपलोड करता येणार आहेत.
व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्ग
नॅशनल टेक्निकल इन्स्टिटय़ूट संस्थेच्या वतीने व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गात बेरोजगारांना अल्प किमतीत मोबाइल, कॉम्प्युटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, टीव्ही, डीव्हीडी, वायरमेन, इलेक्ट्रिशिअन, मोटार वाईंडिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गाबद्दलच्या अधिक माहितीसाठी ९८९२५९४५४४, ०२२-२६५०४१९८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.  
साहित्य पाठवण्याचे आवाहन
‘साप्ताहिक मनोभावना’च्या दिवाळी अंकासाठी समाज प्रबोधनात्मक, अज्ञान-अंधश्रद्धा दूर करणारे तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे साहित्य पूर्ण नाव, पत्ता, ई-मेल, छायाचित्र आणि दूरध्वनी क्रमांकासह २० ऑक्टोबपर्यंत संपादक, साप्ताहिक मनोभावना, भीमनगर, खोली क्रमांक १३६, तानसा पाइपलाइन, राजावाडी, विद्याविहार (पूर्व), मुंबई ४०००७७ या पत्त्यावर पाठवायचे आहे.