सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, १५० मुली ताब्यात Print

प्रतिनिधी
ग्रॅण्ट रोड परिसरात  सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुरुवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला.  अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली  पोलिसांनी ही कारवाई केली.
सिम्प्लेक्स या चार मजली इमारतीवर रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी ग्रॅण्ट रोड परिसरात छापा घातला.
या कारवाईत १५० तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच २०० ग्राहकांनाही अटक करण्यात आली आहे. यातील अनेक तरुणी या बांगलादेशी असल्याचे तपासात उघड झाले आहे. देहव्यापारातील ही मोठी कारवाई होती  असे सूत्रांकडून सांगण्यात येते.