समृद्ध उत्तररंगासाठी.. Print

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

भारत आज ‘तरुणांचा देश’ आहे. स्वाभाविकच उद्या तो ‘वृद्धांचा देश’ होणार आहे. ‘एकत्र कुटुंब’ पद्धतीपासून ‘एकल कुटुंब’ व्यवस्थेमार्गे आपण ‘विभक्त कुटुंब’ रचनेपर्यंत प्रवास केला आहे. या व्यवस्थेत आता वृद्धांना फारसे स्थान नाही आणि विचारही नाही. पाश्चात्य देशांमध्ये ‘सोशल सिक्युरिटी’चा भक्कम आधार निराधार, अगतिक आणि आजारी वृद्धांना मिळतो. आपल्या देशात मात्र त्याचे वारेही फारसे फिरकलेले नाही. त्यामुळे आजवर मुला-नातवांनी फिरवलेली पाठ आणि दुसरीकडे सरकारदरबारी अनास्था अशा कोंडीत ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या धोरणाचा मसुदा अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. तसेच ज्येष्ठांसाठी अंमलात आलेल्या कायद्याअंतर्गत पहिली तक्रारही नुकतीच दाखल झाली आहे. यानिमित्ताने ज्येष्ठांच्या आयुष्यांचा ‘मुंबई वृत्तान्त’ने घेतलेला हा धांडोळा-