अबु जिंदालवर पुरवणी आरोपपत्र दाखल होणार Print

प्रतिनिधी
मुंबई हल्ल्यातील सुत्रधार सैय्यद झैबुद्दीन उर्फ अबू जिंदाल याच्यावर लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल होणार आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. २६ /११ च्या मुंबई हल्ल्यात अबू जिंदाल याची मोठी भूमिका होती. मूळ बीडच्या असणाऱ्या अबूने हल्ल्यासाठी आलेल्या अतिरेक्यांना हिंदीचे प्रशिक्षण दिले होते. हल्ल्याच्या वेळी नरिमन हाऊसमध्ये असलेल्या अतिरेक्यांशी अबू जिंदाल पाकमधील नियंत्रण कक्षात बसून संवाद साधत होता. त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी यापूर्वीच घेतले आहे. या पुरवणी आरोपपत्रात जुंदालच्या कबुलीनामाच्याही समावेश आहे. या पुरवणी आरोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या २० ऑक्टोबरपर्यत तो सादर केला जाईल, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.