हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनिल जाधव यांची फेरनिवड Print

प्रतिनिधी
मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनिल जाधव यांची फेरनिवड झाली आहे. ते सलग तिसऱ्यांदा या पदावर निवडून आले आहेत. २०१२-१३ या वर्षांसाठी फेडरेशनच्या संचालक मंडळावर पुढील सदस्य निवडून आले आहेत. प्रदीप सामंत - उपाध्यक्ष, बी.डी. जगताप - उपाध्यक्ष, व्यंकटेश सामंत - सचिव, छाया आजगावकर-नेरूरकर- खजिनदार, एम. एस. करजगीखेड - सहसचिव, ज्ञानेश्वर गोसावी - सहसचिव, एच. एस. गोरे - सहखजिनदार, दिलीप नागवेकर - सहखजिनदार व व्ही. ए. शेर्लेकर - हाऊसिंग टाइम्सचे संपादक
हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. फेडरेशन नावारूपाला आणण्यात मोलाचे योगदान देणारे रघुवीर सामंत यांच्या निधनानंतर प्रथमच या निवडणुका होत आहेत.