ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान! Print

वसई/ प्रतिनिधी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी वसईतील ९० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान विरंगुळा केंद्र येथे करण्यात आल्याची माहिती नालासोपारा ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय देशमुख यांनी दिली. वसई तालुक्यातील १६ ज्येष्ठ नागरिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. खखडकर, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. चिंतामण दराडे, पुरुषोत्तम पाटील पवार यांनी प्रास्ताविक केले व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. राधा स्वार यांनी वृद्धापकाळात घ्यावयाची काळजी व आहार याचे मार्गदर्शन केले. डॉ. खखडकर यांनी संस्थेला भरघोस देणगीही दिली.