कथा-काव्य स्पर्धा Print

प्रतिनिधी
आम्ही पारलेकर या वार्षिक विशेषांकाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही लघुकथा-काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लघुकथा १२०० शब्दांपेक्षा मोठी नसावी, एका लेखक तसेच कवीला एकापेक्षा अधिक कथा/कविता पाठविता येतील. साहित्य फुलस्केप कागदावर सुवाच्च अक्षरात लिहिलेले असावे, स्पर्धा सर्वासाठी खुली असून स्पर्धेतील प्रत्येकी ३ विजेत्यांचे साहित्य विशेषांकात प्रसिद्ध केले जाणार आहे. इच्छुकांनी  आपले साहित्य आम्ही पारलेकर, १, अल्फा, म. गांधी मार्ग, विलेपारले पूर्व, मुंबई ५७ या पत्त्यावर पाठवायचे असून अधिक माहितीसाठी २६१२२४७५/२६१९२३७६ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ०२२-२६१६२८१७ या फॅक्सद्वारेही साहित्य फॅक्स करता येईल. त्याशिवाय आम्ही पारलेकर संस्थेची माहिती  ६६६.स्र्ं१’ी‘ं१.ूे  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.