आकाशवाणीच्या सभागृहात आज हिंदूी काव्य संमेलन Print

प्रतिनिधी
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सभागृहात शुक्रवार, १९ ऑक्टोबर रोजी हिंदी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या संमेलनात मल्लिका अमरशेख, चंद्रकांत पाटील, प्रफुल्ल शिलेदार, संवेदना, प्रेमरंजन अनिमेष आदी कवी सहभागी होणार आहेत.
तसेच याच दिवशी दुपारी तीन वाजता ‘हिंदी आणि मराठी कवितेमध्ये उपेक्षित समाज’ या विषयावर परिसंवाद होणार असून या कार्यक्रमात विजयकुमार, सतीश काळसेकर, वसंत पाटणकर, सुंदरचंद ठाकूर, विनोद दास हे सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका आकाशवाणीच्या प्रेक्षागृहात उपलब्ध असून हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी खुला आहे.