‘मुसाफिर’ डॉ. अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर! Print

प्रतिनिधी
साध्या प्रोग्रॅमरपासून सुरुवात करून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले संगणक तज्ज्ञ, अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, जागतिक राजकारण, समाजशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास असलेले ‘किमयागार’ डॉ. अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफि र’ हे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
येत्या २७ ऑक्टोबर रोजी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळ सभागृहात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर २८ ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.