‘स्क्रीन’ पुरस्कारासाठी मराठी चि़त्रपट निर्मात्यांना आवाहन Print

प्रतिनिधी
चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा १९ वा ‘कलर्स स्क्रीन वार्षिक पुरस्कार’ सोहळा जानेवारी २०१३ मध्ये होणार आहे. दरवर्षीप्रमाणे चित्रपटनिर्मितीच्या विविध विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना स्क्रीन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत अनेक आशयघन आणि दर्जेदार चित्रपट देणाऱ्या मराठी चित्रपटकर्मीच्या प्रयत्नांनाचेही कौतुक व्हावे, या उद्देशाने उत्कृष्ट मराठी चित्रपट, उत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्रीला ‘स्क्रीन’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या वर्षभरातील उल्लेखनीय मराठी चित्रपटांकडे लोकांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे, ही अतुलनीय संधी ‘स्क्रीन’ने मराठी चित्रपट निर्मात्यांना देऊ केली आहे. या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपल्या प्रवेशिका ‘स्क्रीन’च्या कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन ‘स्क्रीन’कडून करण्यात आले आहे. निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या तीन डीव्हीडी, चि़त्रपटाचे माहितीपत्रक ‘स्क्रीन’, पहिला मजला, एक्सप्रेस टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच पुरस्कारांबद्दलच्या अधिक माहितीसाठी ०२२-६७४४०४७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०११ असेल.