संक्षिप्त Print

एस डी बर्मन श्रवणसत्र
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील आघाडीचे संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या स्मृतिदिन ३१ ऑक्टोबर रोजी आहे. त्यानिमित्त ‘सरगम’ संस्थेतर्फे ‘रागदारी आणि सचिन देव बर्मन’ या श्रवणसत्र विलेपार्ले पूर्व येथील महिला संघ सभागृह, परांजपे रस्ता, रविवार, २८ ऑक्टोबर संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक अमरेंद्र धनेश्वर व चित्रपट संगीताचे अभ्यासक मोहन जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून अधिक माहितीसाठी नितीन फाटक ९८१९९०४३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आरोग्य शिबिराला प्रतिसाद
बहुजन विकास सेवा संघ व डॉक्टर्स ऑफ आंबेडकर नगर अ‍ॅण्ड मूर्ती नगर वेल्फेअर सोसायटीतर्फे कफ परेड आंबेडकर नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मज्जातंतू संवेदना, रक्त, हाडे पोकळी, बीएमडी, रक्तदाब, फुफ्फुस क्षमता, मधुमेह इत्यादी तपासण्या यावेळी करण्यात आल्या. गीता नगर, धोबी घाट, मच्छिमार नगर, गणेश मूर्ती नगर, आंबेडकर नगर इत्यादी परिसरातील तब्बल १ हजार नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मच्छिमार विकास संघटनेचे अध्यक्ष महेश तांडेल, भुवनेश्वर धनु, रवींद्र पांचाळ उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी दीपक कनवाळू, संजय लोखंडे, सुनील साठे, राज सूर्यवंशी, अमरजित सिंग ठाकूर, सुनील जगताप, सिद्धप्पा भायदोंडे, डॉ. हरेश वाघेला, डॉ. निश्चील पटेल, डॉ. अशोक राठोड, डॉ. अनिल शहा, डॉ. गयासुद्दीन शेख आदींनी विशेष सहकार्य केले.
गृहव्यवस्थापन प्रशिक्षण
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ व कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर ते २० जानेवारी दरम्यान गृहव्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनविणे, आर्थिक व्यवस्थापन, महिलाविषयक कायदे याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर महिलांना गृहव्यवस्थापक किंवा मदतनीस म्हणून चांगले आर्थिक मानधन मिळविणे शक्य होईल. तसेच गृहिणींना घरी बसून टिफिन सव्‍‌र्हिस किंवा १५-२० लोकांचे जेवण बनवून देणे यासारख्या उपक्रमांचे मार्गदर्शनही मिळेल. याविषयीच्या माहितीसाठी गुरुवार, ८ नोव्हेंबपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात शोभा लोंढे (९८६९९२५५३३), संजना पवार (९३२४२५६५८८) यांच्याशी मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत संपर्क साधावा.
साहित्य पाठविण्याचे आवाहन
अभिनुजा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘आरोग्यदर्पण’ दिवाळी अंकाचा यावर्षीचा विषय ‘हास्योपचार’ असा असून त्यासंबंधीचे लेख तज्ज्ञ डॉक्टर, रूग्ण यांनी लिहून पाठवायचे आहेत. आरोग्यविषयक विनोदी  कथा, चुटके, हास्योपचार पद्धती याविषयी मजकूर असावा. आपले साहित्य संपादक, आरोग्य दर्पण, अभिनुजा प्रकाशन, १९६६, तारा-भुवन, माडीवाले कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३० या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी (०२०) २४४५०२६० या क्रमांकावर संपर्क साधावा.
विद्यार्थी गुणगौरव
वाघेरी ग्रामविकास मंडळातर्फे दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवार, २४ ऑक्टोबर रोजी सह्य़ाद्री विद्यामंदिर, शिवाजी तलाव, भांडुप पश्चिम येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर रावराणे यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत, असे चिटणीस अशोक रावराणे यांनी पत्रकात म्हटले आहे.
दिवाळी अंकासाठी आवाहन
नंदिनी प्रकाशनाच्या नंदिनी या दिवाळी अंकासाठी विनोदी लघुकथा, कविता, विनोदी चुटके, रंजक किस्से, व्यंगचित्रे, विनोदी प्रवासवर्णने, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांवरचे लेख, मजकूर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबत नामवंत लेखकांच्या उत्कृष्ट लेखांना व कथांना पारितोषिके देण्यात येतील. आपले साहित्य २७ ऑक्टोबपर्यंत संपादिका, नंदिता सानप, २ ए/१०३, इंद्रप्रस्थ सोसायटी, देवरत्न नगर, स्वदेशी मिल रोड, चुनाभट्टी, पूर्व, मुंबई - २२ या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी २४०५२८३५, २४०५०३३३, ९३२४९०९०८७, ८१०८२९५१९१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.