वैद्यकीय मदतीसाठी आवाहन Print

विकास वंकिट यांची पत्नी किर्ती वंकिट यांना कर्करोग झाला असून तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. विकास वंकिट यांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प आहे. शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपी उपचारांसाठी लागणारा खर्च ३ लाख २५ हजार रुपयांच्या घरात असून वंकिट कुटुंबाला आर्थिकदृष्टय़ा हा खर्च परवडणारा नाही. यासाठी विकास वंकिट यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. हिंदूजा रुग्णालयात किर्ती वंकिट दाखल असून त्यांच्यावर ऑन्कॉलॉजी विभागातील  डॉ. सचिन पटेल उपचार करीत आहेत. रुग्ण क्रमांक एचएच नंबर १२६९६९२ असून इच्छुक दात्यांनी ‘पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर’ या नावाने धनादेश  पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल, वीर सावरकर मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९८६९०६६०३७  या क्रमांकावर संपर्क साधावा.