..त्यांच्याशी गप्पा मारायच्या राहूनच गेल्या! Print

अमिताभ बच्चन यांनी जागविल्या यश चोप्रा यांच्या आठवणी
प्रतिनिधी

अलीकडेच, आपल्या ७० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आजारी असूनही यश चोप्रा आवर्जून उपस्थित राहिले होते.  त्यांचा तब्बल ४४ वर्षांचा सहवास मला लाभला. काही दिवसांपूर्वीच ‘व्यायामशाळेतून घरी जाताना सकाळी गप्पा मारायला ये’, असे ते म्हणाले होते. ‘मी नक्की येतो’ असे त्यांना सांगितले होते. पण काही कारणाने जाणे जमले नाही. आणि आता त्या गप्पा राहूनच गेल्या, अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर यश चोप्रा यांच्याबद्दल लिहिले आहे.  माझ्या वाढदिवसाच्या सोहळ्यातील त्यांची भेट हीच अखेरची ठरली. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. तरीसुद्धा ते आवर्जून आले. दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांच्या  संपर्कात आलो असलो तरी ते खऱ्या अर्थाने माझे मित्र होते. ‘यशराज’ स्टुडिओत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना त्यांच्या अनेक भेटी, चित्रपटांतून काम करताना त्यांच्याबरोबर अनुभवलेले असंख्य क्षण, विविध भूमिकाआणि त्याविषयी त्यांच्याशी केलेली चर्चा, गप्पा असे सगळे डोळ्यापुढे आले. माझ्या वाढदिवसाच्या समारंभात यशजींनी केलेले जाहीर भाषण अखेरचेच ठरले. त्यांचा आवाज आजही कानात घुमतोय, अशी भावना बच्चन यांनी ब्लॉगमध्ये नमूद केली आहे.