वेंगुल्र्याच्या श्रीकेपादेवी मंदिर जीर्णोद्धार निधीसाठी नाटय़प्रयोग Print

प्रतिनिधी
 वेंगुर्ले येथील श्रीकेपादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या निधी संकलनासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या विठाबाई नारायण गांवकर यांच्या जीवनावर आधारित आणि  पंचमी निर्मित ‘विठा’ या नृत्यनाटय़प्रयोगाचे आयोजन माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात सकाळी ९.३० वाजता करण्यात आले         आहे.  
या नाटय़प्रयोगाला  देवीच्या भक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकेपादेवी मंदिर जीर्णोद्धार समितीने केले आहे. नाटय़प्रयोगाच्या पत्रिकेसाठी इच्छुकांनी ९९२०९५५१७५ किंवा ९८२०९३०८१०  या क्रमांकावर संपर्क साधावा.