संक्षिप्त Print

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा
तरुणांमध्ये संशोधनाची आवड वाढीस लागण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धे’चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण पदवीधर नसलेल्या तरुणांसाठी खुली आहे. मात्र या स्पर्धेसाठी वयोमर्यादा २५ वर्षांची आहे. महाविद्यालयात कोणत्याही शाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा कोणत्याही महाविद्यालयात न शिकणारे युवक युवतीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित कोणतेही नावीन्यपूर्ण संशोधन या स्पर्धेत पाठवण्यास पात्र ठरू शकते. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या तीन प्रकल्पांना प्रत्येकी १० हजार रुपये एवढय़ा रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील. विजेत्या प्रकल्पांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले असल्यास तज्ज्ञांनाही रुपये एक हजार विशेष पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेसाठी प्रकल्प पाठवण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून माहितीपत्रक व प्रवेश अर्ज परिषदेच्या www.mavipamumbai.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कथा पाठविण्याचे आवाहन
इंटरनेटवर वाचकांसाठी उपलब्ध असलेल्या लिटिजन डॉट कॉम या इंग्रजी कथासंग्रहासाठी कथा पाठवण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर इंग्रजी कथा लिहून त्या कथांचा एक संग्रह तयार केला जातो. या संग्रहासाठी कथा पाठविण्याचे आवाहन संस्थेचे संचालक अपूर्व चतुर्वेदी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी २४, अटलांटा, नरिमन पॉइंट, मुंबई. किंवा ९८६७३७९२३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
वेल्डिंग प्रशिक्षण कार्यशाळा
इन्स्टिटय़ूट ऑफ वेल्डिंग अ‍ॅण्ड टेस्टिंग टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे १ नोव्हेंबरपासून वेल्डिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विविध पात्रता असलेल्यांसाठी पाच विविध अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दोन किंवा एक वर्षे एवढय़ा काळासाठी आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रशस्तिपत्रक आणि १०० टक्के नोकरी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९००४३४२९१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
सुवर्ण महोत्सवी दिवाळी स्नेह फराळ
डॉ. शिरोडकर हायस्कूल, परळ या शाळेतून १९६२ मध्ये एसएससी उत्तीर्ण झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सुवर्ण महोत्सवी दिवाळी फराळाचे आयोजन शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. हा फराळ कार्यक्रम शाळेच्या शिशू विकास हॉल येथे सायंकाळी चार ते सात या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांसह या समारंभात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९६९१८१३३५, ८२८६०१९०७८ किंवा ९९६९१५९९१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
वनिता समाजतर्फे बालक स्पर्धा
लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने वनिता समाजातर्फे बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा शिशुवर्ग ते सहावी इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी ८ डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मुंबई व उपनगपर्यंतच्या शाळेतील मुले भाग घेऊ शकतात. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून प्रवेश अर्ज १५ ऑक्टोबरपासून वनिता समाजात उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी ९८२०३२७५७५ किंवा २४३७७५१७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
वरंडोलकर देशमुख यांना आवाहन
महाड तालुक्यातील वरंडोल येथील सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे. तरी वरंडोलकर देशमुख यांनी माजी नगरसेवक दीपक देशमुख (९८२०७३७९७६) किंवा मिलिंद देशमुख (९८६९०५३३०२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.