माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा Print

प्रतिनिधी
स्टुडंट्स लिटररीअ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमिक मुलींच्या (कमळाबाई) शाळेतून १९७३ ते १९७५ मध्ये इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा ठाकूरद्वार येथील शाळेच्या वास्तूत १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजिला आहे. संस्थेच्या अध्यक्षा व माजी मुख्याध्यापिका डेजी दादरकर व माजी शिक्षिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा स्नेहमेळावा होणार आहे. अधिक माहितीसाठी माजी विद्यार्थिनींनी संस्थेच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दूरध्वनी क्रमांक २२०७२५८१, तसेच अर्चना थिटे-गाडगीळ (२२०३५९३०), तेजस्विनी शिर्के (९३२३१०३६९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.