१० लाख रुपये घेऊन पळणाऱ्या तिघांना अटक Print

प्रतिनिधी
दुकानाच्या क र्मचाऱ्याच्या डोळय़ांत मिरची पूड टाकून १० लाख रुपये लांबवणारे तिघे लोकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे जेरबंद झाले. पैसे पळणाऱ्या एकास लोकांनी पाठलाग करून पकडले तर व्ही पी रोड पोलिसांनी उर्वरित दोघांना राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असतांना नागपाडा येथून अटक केली. शनिवारी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली
वैभव जाधव हा खेतवाडी येथील चॅम्पियन स्टील या दुकानात लेखापालआहे. शनिवारी संध्याकाळी तो चंदनवाडी येथील दुकानात १० लाख रुपये देण्यासाठी निघाला होता. सी.पी. टॅंक येथे मोटारसायकलवरून उतरताना तिघांनी त्याला अडवून त्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण तो बॅग सोडत नसतांना त्यांनी हवेत गोळीबार केला. यामुळे लोक जमा झाले. जमावाने ओमप्रकाश  बिष्णोई याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या माहितीवरून अन्य दोघांना पकडले.