वाढदिवसानिमित्त होणार यशवंत देव यांचा सत्कार Print

‘तुझे गीत गाण्यासाठी’
 प्रतिनिधी
ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त ३ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या कार्यक्रमामध्ये पं. यशवंत देव यांचा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.   या कार्यक्रमात रवींद्र साठे, उत्तरा केळकर, त्यागराज खाडिलकर, तनुजा जोग, अबोल कानडे आदी गायक-गायिका देव यांनी रचलेली गाणी सादर करणार आहेत. याच कार्यक्रमात यशवंत देव यांच्याकडूनच त्यांनी लिहिलेल्या रूबाया, विडंबन गीते, विनोदी कविताही रसिकांना ऐकायला मिळतील. पं. यशवंत देव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिती क्रिएशन्स आणि एकदंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत.