महागाई भत्त्याचा निर्णय पुढील आठवडय़ात Print

प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत पुढील आठवडय़ात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी कर्मचारी संघटनांना दिले. केंद्र सरकारने जुलै २०१२ पासून महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ केली. त्याच धर्तीवर राज्यातही निर्णय घ्यावा आणि दिवाळीपूर्वी चार महिन्यांच्या थकबाकीसह मिळावा, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांची भेट घेत केली. त्यावर महागाई भत्ता वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत पुढील आठवडय़ात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.