बालदिनी ओरिगामाची कार्यशाळा Print

प्रतिनिधी
१४ नोव्हेंबरला दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. निसर्ग मित्र, पनवेल या संस्थेतर्फेही दरवर्षी मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी १४ नोव्हेंबरचा बालदिन बुधवारी येत असल्याने त्या अगोदरच्या रविवारी म्हणजे ११ नोव्हेंबर ला संस्थेने सकाळी १० ते १ या वेळेत ‘कागदाची घडीकला ’ (ओरिगामी) ची कार्यशाळा ठेवली आहे.
श्री. चंद्रशेखर बर्वे (भांडूप) हे या कार्यशाळेत मुलांना ओरिगामीची माहिती, तंत्र व काही कलाकृती करायला शिकवतील. प्रथम येणायास प्रथम प्राधान्य. फक्त ३० विद्यार्थ्यांना प्रवेश.   संपर्क - किशोर म्हात्रे - ९९७००५१४८९ किंवा धनंजय मदन - ९०८७२९०७५९