शहीद जवानांच्या कुटुंबियांना १० लाखाचे सानुग्रह अनुदान Print

खास प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या हद्दीत राज्याच्या पोलीस दलाबरोबर दहशतवाद्यांशी वा नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील व निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देते. तर केंद्र सरकारकडून अशा कारवाईत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलाच्या व निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये मदत देते. राज्याच्या वतीने १० लाख रुपयांचे अनुदान देऊन ही तफावत दूर करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. १ फेब्रुवारी २००९ नंतर संयुक्त मोहिमेत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलातील व निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे.