२० वर्षांवरील टॅक्सी आणि १६ वर्षांंवरील रिक्षा होणार बाद! Print

प्रतिनिधी
मुंबई महानगर क्षेत्रातील २० वर्षांवरील टॅक्सी व १६ वर्षांवरील रिक्षा बाद करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. महानगर क्षेत्रात ४५ हजार टॅक्सी आणि एक लाख पाच हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १३ हजार टॅक्सी आणि २० हजार रिक्षा या प्राधिकरणाच्या निर्णयानंतर बाद होणार आहेत. चार वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाने २५ वर्षांंवरील टॅक्सीना प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली होती. सर्व टॅक्सी-रिक्षा सीएनजी इंधनावर वळविण्यात आल्यावर अनेक टॅक्सी बाद झाल्या होत्या. मात्र अजूनही अनेक टॅक्सींचे आयुर्मान २५ वर्षांंवरील असूनही त्या रस्त्यावर धावत आहेत. परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाद झालेल्या वाहनांचे परवाने नव्या वाहनावर हस्तांतरीत केल्यावर जुनी वाहने भंगारात काढून ती अक्षरश: तोडली जातात. मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे सहसरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले की, महिन्याला सरासरी ४०० रिक्षा नव्याने येतात.