क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे Print

प्रतिनिधी
शासकीय पदवीधर क्ष-किरण तंत्रज्ञ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी तुकाराम साठे तर सरचिटणीसपदी संजय प्रभाकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राज्यव्यापी संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आल्याचे संघटनेच्या पत्रकात नमूद केले आहे. संघटनेच्या खजिनदारपदी राजेंद्र वाढोणकर, उपाध्यक्षपदी मारुती सातवसे आणि सागर सोनावणे यांची निवड झाली असून या निवडीनंतर झालेल्या संघटनेच्या बैठकीत ‘क्ष’ किरण विभागाच्या खासगीकरणाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमआरआय, सीटी स्कॅन आदींचे खाजगीकरण करण्याचे धोरण राबविण्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव असून खासगीकरणाचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.