पु. लं. च्या ‘पाचामुखी’चे आज प्रकाशन Print

प्रतिनिधी
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त परचुरे प्रकाशन मंदिर व हृदयेश आर्टस या संस्थेतर्फे गुरुवार आठ नोव्हेंबर या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात संध्याकाळी सात वाजता हा दृकश्राव्य कार्यक्रम होणार आहे. पु. लं. ची गाजलेली भाषणे व मुलाखतींचा समावेश असलेल्या ‘पाचामुखी’ या पुस्तकाचे यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याला विजया राजाध्यक्ष, जब्बार पटेल, अरुण गुजराथी आदी उपस्थित राहाणार आहेत. फिल्म्स डिव्हीजनने ‘पुलं’वर निर्माण केलेला १०० मिनीटांचा लघुपटही यावेळी दाखवण्यात येणार आहे. प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.