मंडई विकासाचे रखडलेले धोरण अमलात येणार? Print

प्रतिनिधी
राज्य शासनाने सहा-सात वर्षांपूर्वीच मंडई विकासाचे धोरण मंजूर केले होते. परंतु, नंतर या धोरणाला स्थगिती देण्यात आली होती. मंडई विकासाचे हे रखडलेले धोरण आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंडईंचा विकास करण्यासाठी सुधारित धोरण ठरविण्यात येत असून दिवाळीनंतर याबाबत सादरीकरण केले जाणार आहे. याबाबत दिवाळीनंतर चर्चा केली जाणार आहे, असे गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले.