यूथ हॉस्टेलतर्फे मुलांसाठी सह्याद्रीभ्रमण Print

प्रतिनिधी
यूथ हॉस्टेल असोसिएशनच्या मालाड युनिटतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी लोणावळा आणि खंडाळा परिसरात गिरीभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या मोहिमेत एकवीरा मंदिर, डय़ूक्स नोज, लोणावळा, कार्ले व भाजे गुंफा, पवना धरण, लोहगड किल्ला, शिरोटा तलाव, राजमाची किल्ला, उल्हास खोरे, कोंढाणे गुंफा, कोंदिवडे गाव आदी ठिकाणी भ्रमंती करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, साहसी वृत्ती वाढीस लागावी, इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. यंदा या मोहिमेचे सलग १३ वे वर्ष आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी वसंत घाडिगावकर ९८९२११५१८८ व विश्वास सावंत ८०९७६९३४३२ यांच्याशी संपर्क साधावा.