बांधकाम कल्याणकारी मंडळात आता दगडखाण, वीटभट्टी, वाळू कामगारांचाही समावेश Print

खास प्रतिनिधी
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती दगडखाण, वीटभट्टी, वाळू आदी क्षेत्रातील कामगारांनाही लागू करण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय गुरूवारी बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांना बोनस देण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. मात्र कायद्यात तरतूद नसल्याने या प्रश्नावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मात्र इमारत बांधकाम कामगारांप्रमाणेच या उद्योगाशी संबंधित अन्य उद्योगातील कामगारांनाही या सुविधांचा फायदा मिळावा, तसेच बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ९० दिवस काम केल्याबद्दल नियोक्त्याचा दाखला सादर करण्याबाबतची तरतूद वगळण्याबाबत केंद्राच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी शिफासर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.