‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:नमुना प्रश्न Print

कैलास भालेकर, बुधवार, ३० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
९८६०१४६२३६

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामान्य अध्ययन पेपर - ४ मधील अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशात्र आणि कृषी ह्या घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत.

बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरामध्ये देण्यात आलेले आहेत. परीक्षेच्या सर्वागीण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे. परीक्षाभिमुख तयारीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्र. १-  खालील विधानांपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान    (१)आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या सारख्याच संकल्पना आहेत. विधान (२)आर्थिक वृद्धी आणि आर्थिकविकास ह्यांमध्ये फरक असून आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धी पेक्षा अधिक व्यापक आहे. विधान (३) आर्थिकविकासासाठी आर्थिक वृद्धी अत्यावश्यक घटक आहे.
(१) फक्त विधान (१) बरोबर
(२) विधान (१), (२) बरोबर
(३) विधान (२), (३) बरोबर
(४) विधान (१), (२), (३) बरोबर.
प्र. २- मानव विकास निर्देशांकामध्ये खालीलपकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?
(१) दरडोई स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पादन     (२) सरासरी आयुर्मान
(३) शिक्षणाचे प्रमाण
(१) १, २
(२) २, ३
(३) १, ३    
(४) १,२, ३
प्र. ३- ‘सार्वजनिक वस्तू’ Public Goods संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) सार्वजनिक वस्तूंचा वापर सर्वसमावेशक असतो.  विधान    (२) सार्वजनिक वस्तूंचा वापर असमावेशक असतो. विधान(३) सार्वजनिक वस्तूंचा वापर व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नाशी निगडित असतो.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२), (३) बरोबर
(३) विधान (३) बरोबर
(४) विधान (१), (३) बरोबर.
प्र. ४- खालीलपकी चुकीची जोडी ओळखा.
(१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- एस. डी. आर.
(२) यू. एन. डी. पी. - मानव विकास अहवाल.
(३) जागतिक व्यापार संघटना- मानव विकास अहवाल
(४) जागतिक बँक - दीर्घकालीन कर्जे
प्र. ५- दुसरी हरितक्रांती संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) दुसरी हरितक्रांतीने शाश्वत शेती विकासावर अधिक भर दिला आहे.
विधान (२) दुसरी हरितक्रांतीने भारताच्या अन्न सुरक्षिततेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२) बरोबर
(३) दोन्ही विधाने बरोबर
(४) दोन्हीही विधाने चूक.
प्र. ६- चुकीची जोडी ओळखा.
(१) PPP - सार्वजनिक खासगी प्रारूप
(२) BOT - बांधा, वापरा, हस्तांतर करा
(३)  FDI - परकीय थेट गुंतवणूक.  
(४) BOLT - पूर्णपणे सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे उभारलेले प्रकल्प.
प्र. ७ - जागतिक व्यापार संघटनेसंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) भारत जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
विधान(२) मंत्री परिषद ही जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च निर्णय यंत्रणा आहे. विधान (३) जागतिक व्यापार संघटनेच्या करारामध्ये सेवा-व्यापारांचा समावेश होत नाही.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२) बरोबर
(३) विधान (१), (२) बरोबर
(४) विधान (२), (३) बरोबर
प्र. ८- निर्गुतवणुकीकरण ही-
(१) सार्वजनिक उपक्रमांमधील शासनाचा भाग भांडवल हिस्सा वाढविण्याची प्रक्रिया आहे.
(२) खासगीकरण प्रक्रिया आहे. (३) खासगी क्षेत्रातील उद्योगांमधील भागभांडवल शासनाद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया आहे.  (४) यापकी नाही.
प्र. ९ - लघुउद्योगांच्या संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) लघुउद्योग श्रमप्रधान असतात.
विधान (२) लघुउद्योग भांडवलप्रधान असतात.
विधान (३) लघुउद्योगांद्वारे उद्योगांचे विकेंद्रीकरण होण्यास चालना मिळते.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (१), (३) बरोबर
(३) विधान (२), (३) बरोबर    
(४) विधान (३) बरोबर
प्र. १०- राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प खालीलपकी कोणत्या यंत्रणेद्वारे उभारण्यात येत आहे?
(१) केंद्रीय महामार्ग संस्था (२) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
(३) रस्ते विकास महामंडळ (४) यांपकी नाही.
प्र. ११- सहकार विकास निधी खालीलपकी कोणत्या यंत्रणेद्वारे निर्माण करण्यात आला आहे?
(१) प्रादेशिक ग्रामीण बँका (२) अग्रणी बँका  
(३) नाबार्ड  (४) यांपकी नाही.
प्र. १२- शेतमालाच्या किमान आधारभूत कि मती संदर्भात शिफारस खालीलपकी कोणत्या यंत्रणेकडे केली जाते?
(१) कृषी उत्पन्न बाजार समिती (२) नाफेड
(३) नाबार्ड (४) कृषी मूल्य आणि खर्च आयोग
संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून परीक्षाभिमुख तयारी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्व संकल्पनांच्या उपयोजनाचे आकलन आवश्यक ठरते. तसेच अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीतील महत्त्वाच्या घडामोडी, शासकीय कार्यक्रम, यंत्रणा, योजना यांचा अभ्यास आवश्यक ठरेल.

वाचण्यासाठी इमेजवर क्लिक करा.