दहावी परीक्षा पूर्वतयारी Print

श्रीमती मीनाक्षी वाळके, सोमवार, २५ जून २०१२
आय.ई.एस. दिगंबर पाटकर विद्यलय, दादर.

नमस्कार विद्यर्थी मित्रांनो!
आपणा सर्वाचे लोकसत्ता ‘यशस्वी भव!’ मालिकेत आणि शालेय अभ्यासक्रमातील शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच इ. दहावीच्या या टप्प्यात आपले सर्वाचे मन:पूर्वक स्वागत.

एस.एस.सी. च्या अभ्यासक्रमातील इ. दहावीची परीक्षा हा अंतिम टप्पा आहे आणि म्हणूनच महत्त्वाचा आहे.आपण इ. पहिली पासून शिकत आलेल्या संकल्पना, विविध कौशल्ये किती प्रमाणात आत्मसात केली आहेत. त्यावरच या शालान्त परीक्षेचे यश अवलंबून असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील यश महत्त्वाचे असते. आपण इ. नववीपर्यंत जे काही शिकलो आहोत त्याचा कुठे न कुठे दहावीच्या अभ्यासक्रमाशी संबंध आहे. फरक एवढाच आहे की आधीच्या वर्षांत जरी परीक्षा असल्या तरी त्याला स्पर्धात्मक परीक्षेचे स्वरूप नसते.
इ. दहावीची परीक्षा ही राज्यभरातून बसणाऱ्या सर्व विद्यर्थ्यांसाठी सामायिक असते. म्हणूनच त्याचे महत्त्व अधिक आहे. अशा या व्यापक परीक्षेत आपण उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे, हे प्रत्येकालाच वाटत असते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच आपले भवितव्य अवलंबून असते. यासाठी दहावी परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबत या लेखातून मार्गदर्शन करणार आहे. या शिवाय लोकसत्ता यशस्वी भव! मालिका आता तुम्हाला व्हिडिओद्वारेसुद्धा पहायला व अभ्यासयला मिळणार आहे त्याद्वारेसुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे.
विद्यर्थ्यांनी जर सुरुवातीपासूनच रोजच्या रोज नियमितपणे अभ्यास केला तर परीक्षेची भीती किंवा तणाव वाढण्याची काहीच गरज नाही. वर्षांच्या सुरुवातीलाच प्रत्येक विषयाचे पाठय़पुस्तक नीट माहिती करून घ्यावे. पाठय़पुस्तकात प्रत्येक विषयाचे किती धडे आहेत, किती गुणांची प्रत्येक विशयांची प्रश्नपत्रिका असते, एखाद्य विषयात काही बदल झाला आहे का? इ. बद्दलची माहिती अभ्यासाच्या सुरुवातीपाूसन करून घेणे आवश्यक आहे.
दहावी परीक्षेच्या अभ्यासाबाबत स्पष्ट करायचे झाल्यास पुढीलप्रमाणे विचार करावा लागेल. आपण अभ्यासाच्या तीन टप्प्यांबद्दल जाणीव ठेवली तर आपल्याला उत्तम यश मिळण्यास त्याची मदत होईल. १. Learning शिकणे. २. Understanding  आत्मसात करणे. ३. Re-Production- अनुयोजन, उजळणी यापैकी कोणताही टप्पा वगळून चालणार नाही.
१.    शिकणे : वर्गात शिकवला जात असलेला सर्व अभ्यासक्रम जर सुरुवातीपासूनच नीट समजून घेतला तर तो व्यवस्थित ध्यानात राहिल. एखादी गोष्ट समजली नाही तर संकोच न करता विचारणे व समजून घेणे आवश्यक आहे. असे केल्याने आपल्याला जे येत नाही ते समजावून घेण्याचा मार्ग सुलभ होतो. गणितातील संकल्पना, विज्ञानातील नियम किंवा तत्वे, भाषा विषयातील वाचन, लेखन इ. कौशल्ये नीट सुरुवातीपासूनच विकसित झाली तर यश निष्टिद्धr(१५५)तय मिळते.
२.    आत्मसात करणे : शिकवलेला अभ्यासक्रम वारंवार वाचणे, त्यांची टाचण तयार करणे, उत्तरे लिहून काढणे आणि जिथे आवश्यक आहे, तिथे पाठांतर करणे उदा. सुत्रे, नियम, प्रमेय इ. असे केल्याने विषय लक्षात ठेवण्यास मदत होते. आपण स्वत: जेव्हा विषय यंत्रवत पाठांतर न करता तो समजून आत्मसात करतो, तेव्हा तो दीर्घकालपर्यंत आपल्या लक्षात राहतो.
३.    उजळणी करणे : आपण जे काही शिकलो आहोत किंवा आत्मसात केले आहे त्याची उजळणी (अनुयोजन, पुनरावृत्ती) करणे आवश्यक आहे. म्हणजेच वेळोवेळी आपल्याला समजलेल्या विषयाची व आपल्या स्मरणशक्तीची तपासणी होणे आवश्यक आहे. आपल्याला किती कळले आहे आणि आपण तयार केलेली उत्तरे किती बरोबर आहेत याची नियमित पडताळणी लेखी सरावाने करणे आवश्यक आहे. हा सराव सुरुवातीपासूनच केला तर आपल्या चुका कळण्यास मदत होईल. तसेच सुरुवातीपासूनच आपल्या उत्तरामध्ये नीटनेटकेपणा, अक्षराची सुबकता, विषयाची आकर्षक मांडणी या गोष्टींचा अंतर्भाव केल्यास, जास्त गुण मिळण्यास त्याचा नक्कीच उपयोग होईल.
वेळेचे नियोजन : वरील सर्व गोष्टी करीत असताना वर्षांच्या सुरुवातीपासूनच वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. कारण आपल्याला शाळा, गृहपाठ, स्वाध्याय सोडवणे, शाळेत घेतले जाणारे जादा तासांचे वर्ग इ. गोष्टी साधून अभ्यास करायचा आहे. त्याकरिता पहिल्या सत्राचे एक व सत्र परीक्षेनंतरचे वेगळे असे वेळापत्रक करावे लागणार आहे. प्रथम सत्रातील वेळापत्रकात वाचन, चिंतन, मनन, पाठांतर या गोष्टींसाठी वेळ ठेवणे आवश्यक आहे. आपणांस समजण्यास कठीण जाणवत असलेल्या विषयांचा अभ्यास आगोदर करावा व त्यानंतर सोपे विषय अभ्यासावेत. असे करत असतानाच सुरुवातीपासूनच आकृत्या, आलेख, नकाशे सोडविण्याकडे भर द्यवा. जेणेकरून त्यात अचूकता येईल व गुण वाढण्यास त्याची मदत होईल.
प्रथम सत्रानंतरच्या नियोजनात जास्तीत जास्त भर प्रश्नपत्रिका सोडवून वर्ग शिक्षकांकडून त्या तपासून घेण्याकडे असावा. म.रा.मा. व उ.मा. शिक्षण मंडळ परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करते, त्यामुळे कोणत्या विषयाचा पेपर कधी असणार आहे, व त्या विषयाच्या परीक्षेला किती खंड ठेवण्यात आला आहे, याची माहिती आपल्याला आधीच मिळते. त्यानुसार प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि परीक्षेची तयारी करावी म्हणजे अंतिम परीक्षेपर्यंत आपल्या अभ्यासाची वेळोवेळी उजळणी होईल व भीती कमी होईल. यशाची गुरुकिल्ली ही नेहमी आपण केलेल्या नियोजनात व त्यानुसार केलेल्या कृतीत आहे.
शारीरिक स्वास्थ्य/तंदुरुस्ती : वर्षभर आपण आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे आवश्यक आहे. यासाठी दिवसातून थोडा वेळ तरी व्यायाम किंवा योगा तसेच ‘ध्यानधारणा’ करणे आवश्यक आहे. आपली प्रकृती नीट राहिली तर आपण यशस्वीरीत्या वाटचाल करू शकाल. स्वत:वर विश्वस ठेवा. अभ्यासाबरोबर आपला छंदही जोपासा. त्याचा पुढील आयुष्यात तुम्हाला फायदा होईल व परीक्षेचा बागुलबोवा होणार नाही. तुम्हाला नुसतेच शैक्षणिक यश मिळवायचे नाही तर सर्वागीण विकास साधायचा आहे. म्हणूनच सर्व गोष्टींचा समतोल साधून अभ्यास करणे अपेक्षित आहे.
अलीकडे दहावीच्या परीक्षेचे स्वरूप बदललेले आहे. त्यात अंतर्गत व बा अशा दोन्ही स्वरूपाचे मूल्यमापन होणार आहे. अंतर्गत मूल्यमापनात कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे हे सुरुवातीलाच माहिती करून घ्या. त्याच वेळेस कोणत्या विषयासाठी कमीत कमी किती गुण मिळणे अनिवार्य आहे, याची माहिती करून घ्या. अंतर्गत मूल्यमापनात लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट, चाचणीचे गुण अशा गोष्टींचा समावेश असणार आहे. यात मिळालेले गुण अंतिम परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यास मदत करणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्या शाळेत होणारी प्रत्येक गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे, हे विसरू नका!
भावनिक क्षमता : भावनिक क्षमता हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच व्यक्तींना आपल्या मनासारखे घडले नाही की राग येतो. नैराश्य, वैफल्य येते. आपल्याला नको असलेल्या भावना आपण किती तरी वेळ दाबून ठेवतो. आपण त्या व्यक्त कशा करतो हे जास्त महत्त्वाचे असते. उदा. मैदानी खेळातून आपल्या अ‍ॅग्रेसिव्ह भावना व्यक्त करायला वाव मिळतो. म्हणूनच आपली भावनिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यर्थ्यांनी अशा खेळांतून अवश्य भाग घ्यावा.
एकंदरच विद्यर्थ्यांमधील सहनशक्ती कमी होत चालली आहे असे संशोधनाअंती लक्षात आले आहे. पालक आणि जवळचे नातेवाईक याला कारणीभूत आहेत, असे समजते. छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी मुलं नाराज झालेली पालकांना बघवत नाही. मुलांच्या मागण्या ते त्वरित पूर्ण करतात. त्यामुळे मुलांना एखाद्य गोष्टीसाठी थांबण्याची, वाट पाहण्याची सवयच होत नाही. एखादी गोष्ट घडून येण्यासाठी काही कालावधी जावा लागतो याची कल्पनाच त्यांना मानवत नाही.
याकरिता विद्यर्थ्यांनी आपली भावनिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवता आला पाहिजे. दुसऱ्याच्या भवना ओळखता आल्या पाहिजेत. आपली भावनिक क्षमता ही प्रयत्नांती वाढविता येते. त्याचा फायदा त्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी, तसेच परस्परसंबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.
लहानपणापासून आपल्या भावना ओळखायला व हाताळायला शिकले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नको असलेल्या गोष्टी टाळता येतात, तसेच हव्या असलेल्या गोष्टीत अधिक सुधारणा घडू शकते.
मित्रांनो, या लेखातून व व्हिडीओद्वारे मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. (हे व्हिडीओ तुम्हाला लोकसत्ताच्या वेबसाइटवर बघता येतील.) तुम्हीही दररोज पाठय़पुस्तकासोबत लेख वाचा व या मालिकेतील शिक्षकांनी सर्वच विषयांवर तुमच्या बरोबर व्हिडीओद्वारे केलेला संवाद अवश्य ऐका आणि परीक्षेची उत्तम तयारी करून उज्वल यश मिळवा, हीच सदिच्छा!
समन्वयक    : सी. डी. वडके, विद्य प्रबोधिनी, दादर.
उद्यचा विषय : मराठी (प्रथम भाषा)